शासकीय अभियांत्रिकीत ७४ टक्के पदे रिक्त! पुढील पदभरती प्रक्रिया.. | Government Engineering College Yavatmal Bharti 2025
Government Engineering College Yavatmal Bharti 2025
Government Engineering College Yavatmal Vacancies & Recruitment (GCOE Jobs)
यवतमाळचे शासकीय तंत्रनिकेतन बंद करून २०१८मध्ये त्याच इमारतीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले. राज्यभरातून विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी यवतमाळला येतात. पण, आजही महाविद्यालयातील बहुतांश शाखांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक नाहीत. सुमारे ७४ टक्के पदे रिक्त असल्याने तासिकेप्रमाणे प्राध्यापक भरती करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सिव्हिल’, ‘इलेट्रीकल’, ‘इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन’, ‘मेकॅनिकल’ व ‘कम्प्युटर’ अशा पाच शाखा आहेत. प्रत्येक शाखेत ६० विद्याथ्यर्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सध्या १ हजार २५० विद्यार्थी महाविद्यलयात शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात ६८ पदे शैक्षणिकस्तरावर मंजूर आहेत. प्रत्यक्षात पूर्णवेळ १८ पदे भरली गेली आहेत. ५० पदांवर तासिकेप्रमाणे प्राध्यापक नेमले गेले आहेत. तासिकेप्रमाणे नेमलेल्या अभ्यागत प्राध्यापकांना सत्रासाठी नेमून ९५० रुपये तासाप्रमाणे देण्यात येतात. पूर्वी ४५० रुपये याप्रमाणे त्यांना मिळत असत. प्रात्याक्षिक शिकविण्यासाठी ४५० तासिकेप्रमाणे दिले जातात. दरवर्षी जाहिरात आल्यावर इच्छुक उमेदवारांकडून अर्ज बोलविले जातात. शाखानिहाय विचार करता सिव्हिल विभागासाठी १३ पदे मंजूर आहेत. यातील केवळ एक पद भरण्यात आले असून १२ रिक्त आहेत. इलेक्ट्रिलकमध्ये ११ पैकी पाच भरल्याने सहा रिक्त, इलेट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये मंजूर ११पैकी तीन भरल्याने आठ रिक्त, मेकॅनिकलमध्ये मंजूर ११पैकी सहा भरल्याने पाच रिक्त, कम्प्युटरमध्ये ११पैकी दोन भरल्याने नऊ पदे रिक्त आहेत. यासोबतच प्राचार्य, कर्मशाळा अधीक्षक, ग्रंथपाल ही पदेही रिक्त असल्याने शिक्षणकार्यात अडचण निर्माण होत आहे. महाविद्यालयातील चार शाखांसाठी विभागप्रमुख नाहीत. केवळ सिविल शाखेला प्रमुख असून त्यांच्याकडेच प्रभारी प्राचार्यपदाचा पदभार आहे. पूर्वी हे महाविद्यालयालय संत गाडगे बाबा अमरावती विद्यपीठाशी जोडलेले होते. काही अडचण आल्यास त्वरित संपर्क साधून दूर केल्या जात असत. पण, गेल्या काही वर्षांपासून यवतमाळचे हे महाविद्यालय इतर तांत्रिक शिक्षण महाविद्यालयाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यायापीठ लोणारे (जि. रायगड) शी जोडले गेले आहे. या विद्यापीठामार्फत परीक्षा केव्हा घेण्यात येईल, निकाल केव्हा लागेल, गुणपत्रिका कधी मिळणार हे निश्चित नसते. एका विद्यार्थ्याला परीक्षा दिल्यानंतरही गैरहजर दाखविण्यात आले. अंतिम वर्ष उत्तीर्ण झाल्यावर नोकरीसाठी रूजू होताना गुणपत्रिका न मिळाल्याने अडचण वाढली होती, असेही आरोप होत आहेत.
दहा वर्षांपासून भरतीच नाही
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरले जातात. राज्यात गेल्या दहा वर्षांत प्राध्यापकांची भरती झाली नाही. परिणामी अनेक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत तासिकेप्रमाणे अभ्यागत प्राध्यापकांची भरती करून शैक्षणिक सत्र पूर्ण केले जात आहेत.