Akasa Air ११० वैमानिकांनी पदभरती प्रक्रिया २०२३! | Akasa Air 2023

Akasa Airways Job 2023

Akasa Airways Job 2023

Akasa Airways Job 2023 – Akasa, which started its business in the Indian aviation sector last August, is said to have started the process of recruiting 110 pilots soon. In the last few days, some big companies like Air India, IndiGo have purchased new aircraft. This affected some other companies, including the company Accasa. This had an impact on the company’s performance.  The airline had also had to cancel flights on some routes due to lack of pilots. Now, the company has once again decided to recruit pilots with renewed vigour. The company currently has 20 aircraft and 450 pilots in its fleet. The company needs at least 110 more new pilots.

 

गेल्या ऑगस्टमध्ये भारतीय विमान क्षेत्रात आपल्या व्यवसायाची सुरुवात केलेल्या अकासा कंपनीने लवकरच ११० वैमानिकांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांत एअर इंडिया, इंडिगो अशा काही मोठ्या कंपन्यांकडून नव्या विमानांची खरेदी करण्यात आली होती. याचा फटका कंपन्या अकासासह अन्य काही कंपन्यांना बसला होता. त्यामुळे त्याचा परिणाम कंपनीच्या कामगिरीवर झाला होता.  वैमानिकांच्या अभावी कंपनीला काही मार्गांवरील विमानसेवा देखील रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा नव्या जोमाने वैमानिक भरतीचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सध्या कंपनीच्या ताफ्यात २० विमाने असून ४५० वैमानिक कार्यरत आहेत. कंपनीला आणखी किमान ११० नव्या वैमानिकांची गरज आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ही भरती पूर्ण झाल्यावर कंपनीला विविध मार्गांवरील जोडणी वाढवितानाच विद्यमान मार्गांवरील फेऱ्यांमध्ये देखील किमान ३५ टक्क्यांनी वाढ करता येणार आहे. दरम्यान, येत्या डिसेंबरपर्यंत कंपनी सध्याच्या तुलनेत आपल्या फेऱ्यांच्या संख्येत किमान १० टक्क्यांनी वाढ करणार असल्याचे समजते.

 

Akasa करियर लिंक

 


Jet Airways Job 2022: Great opportunity for Pilot Job Seekers. Good things come to those that wait – Jet Airways will be flying again soon!  Inviting pilots who are current and type-rated on the Airbus A320 or Boeing 737NG or MAX aircraft, to apply to join us in creating history as we prepare to relaunch India’s classiest airline. For more details about Jet Airways Job Vacancy 2022, Jet Airways Jobs, Jet Airways Careers 2022, Jet Airway Recruitment 2022, Jet Airways Pilot Jobs, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

भारताच्या एविएशन इंडस्ट्रीमध्ये लवकरच नवे प्लेअर्स एंट्री करणार आहे. यापैकी पहिलं नाव म्हणजे शेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवालाच्या (Rakesh Jhunjhunwala) मालकीची ‘अकासा एअर’ (Akasa Air) तर दुसरं नाव ‘जेट एअरवेज’ (Jet Airways) या कंपनीचं आहे. पुढच्या महिन्यात अकासा एअर कंपनीची कमर्शिअल सर्विस सुरु होणारा आहे. जेट एअरवेजने देखील सप्टेंबरमहिन्यातच आपलं ऑपरेशन सुरु करण्याचं जाहीर केलं आहे. या ऑपरेशनच्या अनुषंगाने जेट एअरवेजने प्लायलट पदासाठी नोकर भरती सुरु केली आहे. सोशल मीडिया एक पोस्ट शेअर करुन जेट एअरवेजने पायलट पदांच्या नोकर भरतीची घोषणा केली आहे.

 

TATA समूहाने अलीकडेच Air India साठी शेकडो विमानांची ऑर्डर देऊन ऐतिहासिक कामगिरी केल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर एवढी मोठी ऑर्डर दिल्यानंतर टाटा ग्रुप एअर इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रियाही सुरू करत आहे. यातच आता शेअर बाजारातील बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीची अकासा एअरने कामकाज वाढवण्याच्या योजनेवर प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून नवीन विमानांची ऑर्डर आणि भरती प्रक्रिया राबवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

 

Akasa Air चे CEO विनय दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी मार्च २०२४ पर्यंत १ हजार जणांची भरती करेल. तसेच कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजारांवर नेईल. यामध्ये सुमारे १,१०० फक्त वैमानिक आणि विमान कर्मचारी असतील. विमान वाहतूक क्षेत्रात भरती नेहमीच मोठ्या प्रमाणात केली जाते, असे त्यांनी अधोरेखित केले. केवळ ७ महिन्यांपूर्वी बाजारात दाखल झालेली अकासा एअर या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा विचार करीत आहे. कंपनीने २०२३ च्या अखेरीस ३ अंकांत म्हणजेच १०० हून अधिक नवीन विमाने ऑर्डर करण्याची योजना आखली आहे.

 

आकासा एअरने सध्या ७२ बोईंग ७३७ मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे. यापैकी १९ विमाने आधीच ताफ्यात सामील झाली असून, एप्रिलमध्ये २० वे विमान मिळणार आहे. यामुळे कंपनी आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू करू शकणार आहे. ७२ विमानांसाठीची कंपनीची ऑर्डर २०२७ पर्यंत पूर्ण होईल. कंपनी पुढील आर्थिक वर्षात आपल्या ताफ्यात ९ विमानांची भर घालणार असून, तिच्या ताफ्यातील विमानांची संख्या २८ वर जाईल. सध्या कंपनी दररोज ११० उड्डाणे चालवते. उन्हाळी हंगामाच्या अखेरीस ती १५० उड्डाणे करण्यात येणार आहेत. आकासा एअरने देशांतर्गत बाजारात ३.६१ लाख कंपन्यांना आपली सेवा दिली आहे.

दरम्यान, एअर इंडियाच्या खासगीकरणानंतर टाटा समूहाने ४७० विमानांची ऑर्डर दिली. टाटा समूहाच्या नेतृत्वाखाली एअर इंडियानेही स्वतःला पुन्हा जागतिक एअरलाइन बनवण्याची योजना आखली आहे. एअर इंडियाने २०२३ च्या अखेरीस ५ हजाराहून अधिक लोकांची भरती करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सुमारे ४,२०० केबिन क्रू आणि सुमारे ९०० वैमानिकांची भरती केली जाणार आहे. सध्या एअर इंडियाकडे १६०० पायलट आहेत.


जेट एअरवेज येत्या सप्टेंबरमध्ये कमर्शिअल भरारी घेण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच, कंपनी ‘पायलट’ पदासाठी मोठी नोकरभरती करणार आहे. 

 

Jet Airways Careers 

DGCA ने दिली मंजूरी

  • मंगळवारी, जेट एअरवेज कंपनीने Airbus A320 विमानांसोबतच Boeing 737NG आणि 737Max विमानांच्या पायलट पदासाठी नोकर भर्ती सुरु केली आहे.
  • जेट एअरवेज कंपनीला 20 मे ला एविएशन रेगुलेटर DGCA कडून एअर ऑपरेटर सर्टिफिकेट मिळालं आहे.
  • यूरोपिअन प्लेनमेकर एअरबस (Airbus) किंवा अमेरिक एअरोस्पेस कंपनी बोइंग (Boeing) कंपनीला विमानांची ऑर्डर दिली आहे.

Jet Airways Applications 2022

जेट एअरवेजने मागवले अर्ज

  • जेट एअरवेजने (Jet Airways) ट्विटमध्ये असं लिहिलंय की, जे लोक वाट पाहतात त्यांच्या वाट्याला चांगल्या गोष्टी येतात.
  • जेट एअरवेज लवकरच पुन्हा भरारी घेणार आहे.
  • आम्ही अशा पायलटांना आमंत्रित करत आहोत, जे Airbus A320 किंवा Boeing 737NG किंवा MAX मध्ये करेंट अथवा टाइप रेटेड पायलट असतील.
  • आमच्यासोबत इतिहास रचाण्यासाठी अप्लाय करा.
  • कारण, भारताची सर्वोत्तम एअरलाईनला पुन्हा एकदा लाँच करण्यासाठी तयारी करते आहे.

Jet Airways Job Vacancy 2022

सप्टेंबरपासून सुरु होईल भरारी…

  • सध्या जेट एअरवेजकडे (Jet Airways) B737NG नावाचं केवळ एकच ऑपरेशनल एअरक्राफ्ट आहे.
  • सप्टेंबरमध्ये संपनाऱ्या तिमाहीत आपली कमर्शिअल भरारी घेण्याचा कंपनीचा विचार आहे.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड