BARTI अंतर्गत युवकांना मिळणार स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी प्रशिक्षण; नोंदणी करा त्वरित | BARTI Training Program 2023
BARTI Training Program 2023
BARTI IBPS Training Program 2023
BARTI Training Program 2023: Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI), Pune invites applications from candidates for free non-resident training for the preparation of competitive examinations for IBPS, LIC, Railway, Bank Clerk and similar posts to 150 students for Kolhapur district and 150 students for Gondia district for Scheduled Caste youth and girls of Maharashtra State through Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI), Pune had come The last date of making the said application was October 26, 2023. Candidates are hereby informed that the last date for submission of online application is being extended till 20th November, 2023.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक- युवतीसाठी कोल्हापुर जिल्ह्याकरीता १५० विद्यार्थ्यांना व गोंदिया जिल्ह्याकरीता १५० विद्याथ्र्यांना आय.बी.पी.एस. एल. आय. सी., रेल्वे, बँक लिपीक व तत्सम पदांच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षणाकरीता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदरील अर्ज करण्याची अंतिम दि. २६ ऑक्टोंबर, २०२३ होती. उमेदवारांना कळविण्यात येते की, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक २० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत वाढविण्यात येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उमेदवारांनी खालील QR Code Scan करून अथवा खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंबंधी काही अडचणी उद्भवल्यास बार्टी संस्थेच्या हेल्पलाईन अथवा ई-मेल द्वारे संपर्क करावा..
अर्ज करण्याची अंतिम दिनांक व ऑनलाईन अर्ज करण्याकरिता लिंक
इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. ०१ / ११ / २०२३ पासून https://docs.google.com/forms/d/1vf- Tjs1PUqdu_HZwFnWZewlltNXr Freb86qBgm taM / edit या लिंकवर ऑनलाईन अर्जाची नोंदणी करावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधे मांग, मांग- गारोडी, मांग-गारुडी, घटकातील १५० प्रशिक्षणार्थ्यांना आय.बी.पी.एस. (IBPS), एल. आय. सी., रेल्वे, बँक लिपिक व तत्सम पदोच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी निःशुल्क निवासी प्रशिक्षणाकरिता हितोपदेशक बहुउद्देशीय संस्था, अकोला प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून अकोला या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. करिता पात्र उमेदवारांकडून दिनांक २० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
पात्रता :
१) उमेदवार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधे मांग, मांग- गारोडी, मांग-गारुडी घटकातील असावा.
२) उमेदवाराचे वय वर्ष १८ ते ३४ पर्यंत असावे. ३) उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा.
४) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
५ ) उमेदवार दिव्यांग असल्यास ४०% पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाचा दाखला साक्षांकित प्रत सादर करावी.
उमेदवार निवडीचे निकष :
- एकूण प्राप्त अर्जातील उमेदवारांची चाळणी परीक्षेद्वारे गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात येईल.
- पात्र उमेदवारांची उत्पन्न मर्यादा रु. ८ लाखांपर्यंत असावी.
चाळणी परीक्षेचे स्वरूप :
संबंधित पूर्व प्रशिक्षण आय.बी.पी.एस., एल. आय. सी., रेल्वे, बँक लिपिक व त्या समकक्ष पदाच्या परीक्षेच्या धर्तीवर असेल.
प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती:
आरक्षण ३०% जागा महिलांसाठी राखीव.
४% जागा दिव्यांगांकरिता राखीव.
ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख २०/११/२०२३
प्रशिक्षण कालावधी ०६ महिने (निवासी)
प्रशिक्षण कालावधीदरम्यान उमेदवारांना निवास, चहा, नाश्ता व भोजन व्यवस्था प्रशिक्षण केंद्रामार्फत केली जाईल.
सदर योजनेबाबत / प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा घोरणात्मक पेचप्रसंग इ. निर्माण झाल्यास याबाबतचे सर्व अंतिम अधिकार मा. महासंचालक, बार्टी यांना राहतील.
प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी दरम्यान कोणताही शासकीय / निमशासकीय खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही. उमेदवारांना बार्टीमार्फत स्पर्धा परीक्षा तयारीसाठी रु. ५,०००/- किंमतीचे पुस्तकांच्या खरेदीसाठी लाभ देण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ७५ टक्के उपस्थिती असणे अनिवार्य आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी बार्टीमार्फत (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, UPSC नागरी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण आणि बैंक (IBPS) रेल्वे, एल. आय. सी. इ. व तत्सम स्पर्धा परीक्षांचे यापूर्वी प्रशिक्षण घेतले असेल त्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांची प्रशिक्षण कालावधीदरम्यान निवासी व भोजनाची हितोपदेशक बहुउद्देशीय संस्थेमार्फत निःशुल्क व्यवस्था
करण्यात येईल. अर्ज करण्याची अंतिम दिनांक व ऑनलाईन अर्ज करण्याकरिता लिंक
इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. २०/११/२०२३ पर्यंत https://docs.google.com/forms/d/1TcOTpHb XxSpn1kxMZxxJIH6f4c2Uy QuR98X9GEhAwk/edit या लिंकवर
ऑनलाईन अर्जाची नोंदणी करावी
1 | Extension for IBPS Non Residential Kolhapur and Gondia | Announcements |
Download (3.3mb) |
31-10-2023 |
2 | Extension for IBPS Residential Akola | Announcements |
Download (3.3mb) |
31-10-2023 |
3 | Retender IBPS of Residential Chh. Sambhajinagar | Announcements |
Download (3.3mb) |
31-10-2023 |
4 | Cancellation IBPS of Residential Chh. Sambhajinagar | Announcements |
Download (3.3mb) |
31-10-2023 |
5 | Announcement for IBPS | Announcements |
Download (3.3mb) |
31-10-2023 |
BARTI Training Program 2023
BARTI Training Program 2023 : Scheduled Caste Category (SC) students preparing for the competitive examination Dr. MPSC Prelims Training will be provided by Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI). For this, 200 students were to be selected earlier in each department of the state. However, the number of these seats has been increased from 200 to 1000 for Pune division. Meanwhile, BARTI Director General Sunil Vare has announced an important decision that this training will be given to 300 students instead of 200 by increasing the number of seats in Nashik division by 100. Know More about BARTI Training Program 2023 at below:
अनुसूचित जाती प्रवर्गातील (एस. सी.) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने एमपीएससी पूर्वपरीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात यापूर्वी २०० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार होती. परंतु, पुणे विभागासाठी २०० वरून या जागांची संख्या १ हजार इतकी करण्यात आली आहे. तर, नाशिक विभागातील जागांमध्येही १०० ने वाढ करत २०० ऐवजी ३०० विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी जाहीर केला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मागासवर्गीय घटकांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासह त्यांना सरकारी नोकरीतही संधी मिळावी, यासाठी बार्टीच्या वतीने स्पर्धा परीक्षा तयारीसाठी प्रशिक्षण दिले जाते. यासाठी एकूण जागांची निश्चितीही केली आहे. त्यानुसार विभागनिहाय जागांचीही संख्या आधीच स्पष्ट करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे विभागासाठी ती पूर्वी प्रत्येकी २०० होती. परंतु, पुणे आणि नाशिकमध्ये ही संख्या वाढविली आहे. पुण्यात तब्बल ८०० जागांची वाढ करत त्या १००० केल्या आहेत. तर नाशिकमध्ये १०० जागांची वाढ केल्याने आता ३०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणात सहभागी होता येईल.
या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची चाचणी परीक्षेद्वारे निवड केली जाईल. त्यात गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थी निवड केली जाते. परीक्षा दिलेल्यांना अर्ज करण्याची गरज नाही. १९ सप्टेंबर रोजी बार्टीने एमपीएससी बार्टी सीईटी २०२३ परीक्षा घेतली होती. – त्यात जे विद्यार्थी सहभागी होते, त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असेही बार्टीने कळविले आहे.
स्पर्धा परीक्षा तयारीसाठीच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित इच्छूक उमेदवारांनी ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत. त्यात आधार कार्ड नंबर आणि जन्मतारीख ही माहिती अचूक भरण्याबाबत बार्टीने स्पष्ट सूचित केले आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
BARTI Training Program 2022
BARTI Training Program 2022 : Free residential training program for pre-preparation for clerical class competitive examination at Scheduled Caste Mang, Mantag, Minimadiga, Dakhni-Mang, Mang-Mhashi, Madari, Garudi, Radhe Mang, Mang-Garodi, Bank for the youth of Mang-Garudi community, Railways, LIC in Maharashtra. Further details are as follows:-
Competitive Coaching Exam – BARTI
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मांग-गारुडी इतर तत्सम संवर्गातील ५० विद्यार्थ्यांना आय.बी.पी.एस., एल.आय.सी., रेल्वे, बँक लिपीक व त्या समकक्ष पदाच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी ४ महिन्यांच्या कालावधीचे (निवास व भोजन व्यवस्थेसह) मोफत प्रशिक्षण कार्यक्रम (कोचिंग क्लासेस) खाजगी संस्थेच्या माध्यमातून ओम व्हिजन ॲकॅडमी पुणे या एका ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मांग, मांतग, मिनिमादिगा, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधे मांग, मांग-गारोडी, मांग-गारूडी समाजातील युवक-युवतींसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. मध्ये लिपीक वर्गीय स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत निवासी प्रशिक्षण कार्यक्रम
वरील जातींच्या इच्छुक व पात्र युवक-युवतींना Website:http//:barti.maharashtra.gov.in या वेबसाईट वरुन ‘Notice Board’ च्या सदराखालील Coachings Mang-Matang लिंक वरून अर्ज डाऊनलोड करुन किंवा खालील नमूद संस्थेच्या कार्यालयातून प्राप्त करून, खालील ओम व्हिजन ॲकॅडमी प्रशिक्षण ओम व्हिजन अॅकॅडमी, स्वाध्याय महाविद्यालय, तळ मजला, लक्ष्मी रोड, सदाशीव पेठ, पुणे-४११०३०. संपर्क क्र. ९०६७४३६०८४ माध्यमातून राबविण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी पुणे महसूल विभागातील केंद्राशी संपर्क साधून त्या केंद्राकडे अर्ज दि. १५/०७/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करण्यात यावे. सदर योजनेबाबत / प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास त्यामध्ये बदल करण्याचे |अथवा सदर जाहिरात रद्द करण्याचे सर्व अधिकार महासंचालक, बार्टीस तसेच शासनास राहतील.
BARTI Exam Training 2022
Table of Contents
Aplya Maharashtra madhe ekun grampachayti kiti ahet