पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ३० एप्रिलपासून परीक्षा होणार, पूर्ण माहिती बघा! – BAMU Exam Timetable
BAMU Exam Timetable
BAMU Exam Timetable
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पदव्यूत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा येत्या ३० एप्रिलपासून घेण्यात येणार आहे. चार जिल्ह्यांत १२० केंद्रांवर सुमारे ७४ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळांच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली. विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा २ व १६ एप्रिल सुरळीतपणे सुरू आहेत. पदवी परीक्षेला एकूण २ लाख ४७ हजार ७०९ विद्यार्थी आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आता तिसऱ्या टप्प्यात पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा ३० एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यामध्ये एम.ए, एम.एस्सी व एम.कॉम. साठी ७६ परीक्षा केंद्रे आहेत तर बी.एड्. अभ्यासक्रमासाठी २६ परीक्षा केंद्रे आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची परीक्षा ३० एप्रिलपासून सुरू होईल तर विधि (७ केंद्र), अभियांत्रिकी (६) तर औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे १२ परीक्षा केंद्रे आहेत. या तीन अभ्यासक्रमांची परीक्षा १५ मेपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी चार जिल्ह्यांत एकूण ३२ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सदरील परीक्षा सुरळीत पार व कॉपी मुक्त वातावरणात पार पाडाव्यात तसेच परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सहकेंद्र प्रमुखांची नियुक्ती केली आहे. उन्हाळी २०२४ परीक्षांचे निकाल विहीत मुदतीत जाहीर होण्याच्या दृष्टीने पदवी अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यानिहाय १६ मूल्यांकन केंद्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास ८ मूल्यांकन केंद्रे निश्चित केल्याचेही संचालक डॉ. गवळी यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
BAMU Exam Timetable : Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University’s B.Sc, B.Com, B.Com Economy, BA, BCA, BBA, B.Sc, BSW examinations will be held. Meanwhile, since students do not have the practice of writing, the students who take the exam will get an extension of 15 minutes per hour. Further details are as follows:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीएस्सी, बीकॉम, बीकॉम इकॉनॉमी, बीए, बीसीए, बीबीए, बीएस्सी, बीएसडब्लू या अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव नसल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रती तासाच्या पाठीमागे १५ मिनिटे वेळ वाढवून मिळणार आहे.
- गेल्या दोन वर्षांपासून करोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत होत्या.
- आता करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे विद्यापीठ प्रशासन ऑफलाइन परीक्षा घेणार असून, परीक्षा विभागाने पदवी वर्गाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
- एक जूनपासून पदवीच्या परीक्षा सुरू होत आहेत.
- याअंतर्गत बीएस्सी, बीकॉम, बीकॉम इकॉनॉमी, बीए, बीसीए, बीबीए, बीएस्सी, बीएसडब्लू या अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत.
- दरम्यान, विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव नसल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रती तासाच्या पाठीमागे १५ मिनिटे वेळ वाढवून मिळणार आहे, असेही डॉ. मंझा यांनी स्पष्ट केले.
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षाही सुरू
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या पुढे ढकलल्या गेलेल्या उन्हाळी प्रात्यक्षिक परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
- यानुसार शुक्रवार १३ मे पासून या परीक्षा कॉलेजस्तरावर ऑफलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत.
- या परीक्षा ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहेत.
- पदवी अभ्यासक्रमाच्या उर्वरित सम सत्रांच्या परीक्षा ३० मे ते ११ जून दरम्यान पार पडतील.
- पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या आणि सम सत्रांच्या परीक्षा २३ ते ३१ मे दरम्यान घेण्यात येईल.
- परीक्षेकरिता अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची नेमणूक कॉलेजांना आपल्या स्तरावर करायची आहे.
- परीक्षेनंतर ७ दिवसांच्या आत विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाकडे सादर करावे लागणार आहेत.