दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर

SSC, HSC timetable announced

बारावीची परीक्षा दि.18 फेब्रुवारीपासून; दहावीची परीक्षा 3 मार्चला सुरू होणार

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे.

राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर कोकण या एकूण 9 विभागीय मंडळामार्फत एकाच वेळी दहावी, बारावीच्या परीक्षा होणार आहेत. राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर लेखी स्वरुपात सूचना मागविण्यात आल्या होत्या. संघटना, पालक, शिक्षक यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार परीक्षांसाठी संभाव्य वेळापत्रकच निश्‍चित करण्यात आलेले आहे. दिनांकनिहाय सवीस्तर अंतिम वेळापत्रक राज्यमंडळाच्या संकेतस्थळावर सोमवारी (दि.18) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला सुरू होणार असून ती 18 मार्च रोजी संपणार आहे. दहावीची परीक्षा 3 मार्च रोजी सुरू होणार असून 23 मार्च रोजी संपणार आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे.

छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करूनच विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ठ व्हावे लागणार आहे. मंडळाव्यतिरिक्त अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले व व्हॉट्‌स ऍप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे राज्यमंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

सौर्स : दैनिक प्रभात

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड