बांधकाम खात्यातील अभियंता भरती ताबडतोब रद्द करा – कोणत्याही क्षणी आदेश शक्य! – PWD Goa Bharti 2023
PWD Goa Bharti 2023
PWD Goa Bharti 2023
सार्वजनिक बांधकाम खात्यातील 345 पदांसाठी झालेली आणि राजकीय हस्तक्षेपांमुळे सध्या गाजणारी कर्मचारी भरती प्रक्रिया रद्द करावी यासाठी गोवा सरकारवर जनमताचा वाढता रेटा आहे. ही प्रक्रियाच रद्द करण्याचा आदेश आता खुद्द पक्षश्रेष्ठींकडून दिला जाणार आहे. सत्ताधारी भाजप वर्तुळातील अनेकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आज ही भरती प्रक्रिया रद्द करणेच इष्ट ठरेल असा अनुभवी सल्ला दिला. सरकारने हा निर्णय घेतला नाही तर या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही काहींनी सुरू केली आहे. हा मोठा घोटाळा असल्याचे अनेक जणांचे म्हणणे असून भाजपच्या गाभा समितीच्या सदस्यांनीही सदर भरती प्रक्रिया रद्द कऱण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे सांगितले आहे.
राजकीय साठमारीत सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारी भरती अडकू नये यासाठी कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक साहाय्यक या 345 पदांसाठी लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत. दुसरीकडे विरोधी आमदारांनी शिफारस केलेल्या उमेदवारांची निवड मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे उघड होत असल्याने ही भरती प्रक्रिया गोवा राज्य कर्मचारी भरती आयोगाद्वारे पुन्हा करावी असा दबाव सत्ताधारी वर्तुळातून वाढत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांची नाराजी ओढवून घेण्याची भाजप सरकारची मुळीच तयारी नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाआधी जेवढ्या कटकटींना सामोरे जावे लागले, त्याच्या दुप्पट मानसिक त्रास सोसण्याची वेळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर आल्याचे समजते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारी भरतीची गुणवत्ता यादीची प्रतीक्षा उमेदवारांना लागून राहिली आहे. मात्र या ३४५ पदांवर कोणाची निवड झालीय याबाबत अजून नीट माहिती मिळत नसल्याने तसेच आपल्याला डावलले गेले आहे हे स्पष्टपणे समजू न शकल्याने अद्याप आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले नाहीत. नीलेश काब्राल यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे खाते स्वतः मुख्यमंत्री आपल्याकडे ठेवणार आहेत का? आणि ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवणार आहेत का? याची अनेकजण डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात ही प्रक्रियाच रद्द होण्याची भीती सतावू लागली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंता व तांत्रिक साहाय्यकांची मिळून चारशेहून अधिक पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी दोन महिन्यांत प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्या खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी विधानसभेत सांगितले. प्रश्नोत्तर तासाला आमदार व्हेंजी व्हिएगस यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर तीन गतिरोधक गेल्या वर्षभरात घालण्यात आले नसल्याचेही त्यांच्या लक्षात आणून दिले. आमदार वीरेश बोरकर यांनी तिसवाडीतील इतर मतदारसंघांत कामे होतात; पण सांतआंद्रेतच का नाहीत, अशी विचारणा केली.
बोरकर यांचा यासंदर्भातील मूळ प्रश्न होता. ते म्हणाले, कामांना केवळ प्रशासकीय मान्यता मिळते. त्यापुढे फाईल सरकत नाही. प्राधान्याने करावयाच्या कामांना प्राधान्य मिळत नाही. प्रलंबित कामे कधी मंजूर होणार याची माहिती द्यावी. आता मी कामांची फाईल सभागृह पटलावर ठेवतो, ती कामे कधी मंजूर होणार हे सांगावे. आमदार निधीतील कामेही मंजूर होत नाहीत. व्हिएगस यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यावर किती काळात गतिरोधक घालणार, अशी विचारणा केली. आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी खाते कधीपासून ई-प्रशासनाकडे वळणार, असे विचारले.
काब्राल यांनी या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले, की कनिष्ठ अभियंत्यांना साहाय्यक अभियंतापदी बढती दिली तरी त्यांना कनिष्ठ अभियंता पदाचेही काम करावे लागते. हीच बाब कार्यकारी अभियंता आणि पर्यवेक्षक अभियंता पदावर काम करणाऱ्यांची आहे. एकेका अधिकाऱ्याकडे दोन-दोन पदांचे ताबे असल्याने काही प्रमाणात कामे मागे पडली आहेत.
बोरकर यांनी नेमक्या कामाविषयी विचारल्यास त्यांना ते काम कुठवर आले ते सांगता येईल. गतिरोधकांचा विषय ७-८ महिन्यांत मार्गी लावणार. सगळे गतिरोधक एकाच मापाचे असावेत, असे धोरण निश्चित करण्यात येत आहे. सर्व सेवांसाठी एक ॲप आणले जाणार आहे.
PWD Goa Bharti 2023 : Public Works Department Minister Nilesh Cabral said that 100 posts would be filled on a contract basis. This information was given by the minister while 300 posts including junior engineers and technical assistants were pending in the last tenure of the Sawant government. Further details are as follows:-
सार्वजनिक बांधकाम खात्यात यापूर्वी न्यायालयाने हस्तक्षेप केल्याप्रमाणे ‘निलंबित’ केलेली अभियंत्यांची ‘मेगा भरती’ पुन्हा गुपचूप भरून टाकण्यासाठी सरकारने प्रयत्न चालविल्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
खात्यात ज्येष्ठ व कनिष्ठ स्तरावरील ही 367 पदे भरायची असून गेल्या खेपेप्रमाणेच यावेळी त्यात घोटाळा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांतील अभियंत्यांची ही ‘मेगा भरती’ असून सरकारच्या योजनेनुसार, पूर्वी म्हणजे २०२१ साली ज्यांनी या पदांसाठी अर्ज केले होते, त्यांनाच आता नव्याने संधी दिली जाणार आहे. त्यावर पालकांचे म्हणणे आहे की, २०२१ नंतर दोन वर्षांत नव्याने किमान १५० इंजिनिअर गोव्यात तयार झाले असून त्यांनाही अर्ज करण्याची संधी मिळायला हवी आणि ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी ‘जीपीएससी’सारख्या स्वतंत्र संस्थेमार्फत ती घेण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन मंत्री दीपक पाऊसकर यांच्या कारकिर्दीत ‘मेगा भरती’चा हा कथित घोटाळा घडला होता आणि त्या पद्धतीवर तत्कालीन आमदार बाबूश मोन्सेरात यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.
निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हे आरोपनाट्य रंगल्यानंतरही सरकारने कधीच भ्रष्टाचाराचा आरोप नाकारला नाही. एवढेच नव्हे, तर उच्च न्यायालयात या प्रक्रियेला आव्हान दिल्यानंतर गोवा सरकारने ही नोकर भरती प्रक्रिया नव्याने सुरू करण्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. सरकार आता आपल्याच प्रतिज्ञेला हरताळ फासत असून पुन्हा त्याच ‘वादग्रस्त’ अर्जदारांमधून उमेदवार प्रक्रिया दामटली जाणार आहे, अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
सरकारने अचानक गेल्या आठवड्यात प्रक्रिया पूर्ण न करता घाईघाईत ज्यांनी 2021 मध्ये अर्ज केले होते, त्यांनाच मोबाईलवर संदेश पाठवून अभियंत्यांच्या पदांसाठी परीक्षेला बसण्याच्या सूचना पाठविल्या आहेत. 11जून रोजी ही परीक्षा होणार आहे.
त्यामुळे 2021 नंतर अभियंता बनलेल्यांनी काय ‘पाप’ केले म्हणून त्यांना ही संधी नाकारली, हा प्रश्न आहेच, शिवाय जुन्यांपैकीच उमेदवारांना संधी दिली तर पुन्हा ‘गोलमाल’ होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
नवी भरती करताना – सरकारने जुन्याच गोष्टींची पुनरावृत्ती करून आरोपांचा चिखल उडवून घेण्यापेक्षा – पारदर्शकता निर्माण करावी, वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करावी, गोवा लोकसेवा आयोगामार्फतच नव्याने संपूर्ण प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम खात्यात गेली अनेक वर्षे अभियंते पदावर असलेल्या बऱ्याच अधिकाऱ्यांनी आपल्या अभियंता मुलांची वशिलेबाजीने या पदांवर नियुक्ती करून घेतली होती. त्यातील अनेकांनी गेल्या काही वर्षांत भरपूर माया जमवली असून त्यातून त्या अभियंता पदासाठी 40 ते 50 लाख रुपये लाच देणे त्यांना कठीण वाटले नाही.
गंमत म्हणजे, घोटाळ्याचा गवगवा होऊन न्यायालयाने ही ‘मेगा भरती’ थांबविल्यानंतर त्यातील अनेकांना त्यांचे पैसे अद्याप परत मिळालेले नाहीत. काहींनी संबंधित व्यक्तींच्या घरी जाऊन आपले पैसे वसूल केले असले, तरी बहुतेकांचे फोनही संबंधित व्यक्ती घेत नाहीत.
एका जाणकाराने प्रतिक्रिया देताना सांगितले की, मामलेदारांच्या पदासाठी आता जीपीएससीमार्फत परीक्षा घेतल्या जातात. सरकारच्या कनिष्ठ पदांवरही भरतीसाठी कर्मचारी निवड आयोगामार्फत परीक्षा होतात.
असे असताना सार्वजनिक बांधकाम खात्यातील गॅझेटेड इंजिनिअरांची पदे अशी घाईघाईने भरण्याचे प्रयोजन काय असू शकते? हेच अभियंते उद्या विकासकामे, पाणी पुरविण्यापासून, मलनिस्सारण व रस्ते, पूल आदी योजना राबविणार आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे अधिकारी असे तडकाफडकी भरणे योग्य आहे का?
ही अत्यंत महत्त्वाची पदे असल्याने संपूर्ण प्रक्रिया नव्याने सुरू करून २०२१ नंतर अभियंते बनलेल्यांनाही नोकर भरती खुली असावी.
ही नोकरभरती संपूर्णत: जीपीएससीमार्फत घ्यावी व ती संपूर्ण पारदर्शक होण्यासाठी तिचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जावे.
नोकर भरती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयारीसाठी सध्याची एक आठवड्याची मुदत पुरेशी नसून रितसर एक महिना मुदत देण्यात यावी.
पहिल्या नोकर भरतीची जाहिरात २७ ऑगस्ट २०२१ रोजी दिली होती. त्यानंतर वर्षाकाठी गोव्यात ८०० विद्यार्थी अभियंते परीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांनाही संधी मिळावी, ही वास्तवपूर्ण मागणी आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटावर 100 पदे भरती जाणार असल्याचे खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी स्पष्ट केले. सावंत सरकारच्या गेल्या कार्यकाळात कनिष्ठ अभियंता व तांत्रिक सहायक मिळून 300 पदे प्रलंबित असताना मंत्र्यांनी ही माहिती दिली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
PWD Goa Recruitment 2022 | Goa PWD Bharti 2022
काब्राल म्हणाले की, खात्यात मनुष्यबळाचा तुटवडा आहे. लोकांच्या दैनंदिन गरजांशी खाते निगडीत असल्याने ही पदे रिक्त ठेवून चालणार नाहीत. मागील सरकारच्या काळात कनिष्ठ अभियंता व तांत्रिक सहायक भरतीबाबत कथित घोटाळ्याचा तक्रारींची चौकशी समिती मार्फत चालू आहे. अहवाल आल्यानंतर काय तो निर्णय घेण्यात येईल. नव्या कंत्राटी १०० पदांच्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवणार आहे आणि ही पदे देखील कर्मचारी निवड आयोगच भरणार आहे. दीपक पाऊसकर बांधकाम मंत्री असताना कनिष्ठ अभियंता व तांत्रिक सहायक पदे भरण्यासाठी प्रत्येकी ३० ते ३५ लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर भरती स्थगित ठेवून चौकशीसाठी आयएएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती; परंतु या आयएएस अधिकाऱ्याचीच नंतर गोव्यातून बदली झाली. ही पदे अजून भरलेली नाहीत.
Goa PWD Recruitmet 2022 Details
Goa PWD Recruitment 2022
Cabral said there is a shortage of manpower in the account. These posts will not be left vacant as the account deals with the daily needs of the people. The committee is investigating allegations of alleged scams in the recruitment of junior engineers and technical assistants during the previous government. It will be decided after receiving the report. In case of 100 new contract posts, I will send a file to the Chief Minister and these posts will also be filled by the Staff Selection Commission. When Deepak Pauskar was the construction minister, he was accused of accepting bribes of Rs 30-35 lakh each to fill the posts of junior engineer and technical assistant. A three-member committee headed by an IAS officer was set up to look into the matter; But this IAS officer was later transferred from Goa. These posts are not yet filled.
Goa PWD Recruitment 2022 Details
PWD Goa Bharti 2021 : Public Works Department, Goa has published the recruitment notification for the interested and eligible candidates. Eligible candidates apply online before the last date. Further details are as follows:-
The online application is invited from the Public Works Department Goa for the interested and eligible candidates. The name of the post is “Technical Assistant, Junior Engineer”. There are a total of 368 vacancies available to fill with the posts for PWD Goa Recruitment 2021. The employment place for this recruitment is Goa. Applicants need to apply online mode for PWD Goa Vacancy 2021. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date of submission of the application is the 27th of September 2021. For more details about PWD Goa Application 2021, visit our website www.MahaBharti.in.
सार्वजनिक बांधकाम विभाग, गोवा येथे तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 368 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ अभियंता
- पद संख्या – 368 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 7 सप्टेंबर 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2021
- अधिकुत वेबसाईट – pwd.goa.gov.in
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For PWD Goa Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
|
✅ ऑनलाईन अर्ज करा |
Public Works Department Goa Bharti 2021 Details |
|
? Name of Department | Public Works Department, Goa |
? Recruitment Details | Public Works Department Goa Recruitment 2021 |
? Name of Posts | Technical Assistant, Junior Engineer |
? No of Posts | 368 Vacancies |
? Job Location | Goa |
✍? Application Mode | Online |
✅ Official WebSite | pwd.goa.gov.in |
Educational Qualification For Public Works Department Goa Recruitment 2021 |
|
Technical Assistant | Applicants should possess a Degree/ Diploma from a recognized university |
Junior Engineer | Applicants should possess Degree/ Diploma from recognized university |
PWD Goa Recruitment Vacancy Details |
|
Technical Assistant | 131 Vacancies |
Junior Engineer | 237 Vacancies |
All Important Dates | @pwd.goa.gov.in |
|
⏰ Last Date | 27th of September 2021 |
PWD Goa Bharti Important Links |
|
? Full Advertisement | |
✅ Application Link |
Table of Contents