UPSC NDA/NA भरतीची पुढील आठवड्यात जाहिरात येणार,UPSC परीक्षेचे नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर ! वार्षिक कैलेंडर प्रकाशित – UPSC Annual Calendar 2025
UPSC Annual Calendar 2025
UPSC CGS Prelims Exam 2025 Timetable
केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुधारित वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार एनडीए, एनए १ भरती परीक्षेसाठी अधिसूचना येत्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. ही अधिसूचना अधिकृत वेबसाईट https://upsc.gov.in/ exams/exam-calendar वर प्रसिद्ध केली जाईल. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ते डाऊनलोड करू शकतात.
सुधारित वार्षिक कॅलेंडरनुसार राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षेची अधिकृत अधिसूचना ११ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल. भरती परीक्षेसाठी अर्ज करण्यास ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दिली जाईल. ही परीक्षा १३ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. दरवर्षी राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जात आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १४ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी परीक्षेची अधिसूचना २८ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, १७ जून २०२५ पर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नागरी सेवा पूर्वपरीक्षा आणि भारतीय वन सेवा पूर्वपरीक्षा २०२५ साठी अर्ज प्रक्रिया २२ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल. ११ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ही भारतीय वन सेवा पूर्वपरीक्षा २५ मे २०२५ रोजी घेतली जाईल. शिवाय, भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०२५ ही १६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. नागरी सेवा परीक्षा २२ ऑगस्ट २०२५ रोजी घेतली जाईल. यूपीएससीद्वारे पहिल्या टप्प्यासाठी ११ डिसेंबर २०२४ रोजी सीडीएस परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली जाईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
UPSC 2025 Exam Schedule: Union Public Service Commission (UPSC) has declared the Geo Scientist Prelims Exam 2025 Time Table. The exam schedule is available on upsc.gov.in. Click on the below link to download the timetable.
संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत भू शास्त्रज्ञ (CGS) प्राथमिक परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत. वेळापत्रक अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर उपलब्ध आहे. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
संघ लोकसेवा आयोग (UPSC) ने भू शास्त्रज्ञ (CGS) प्राथमिक परीक्षा 2025 चे वेळापत्रक जारी केले आहे. UPSC ने अधिकृत वेबसाइट- upsc.gov.in वर हे वेळापत्रक जारी केले आहे.
UPSC Revised 2025 Timetable
UPSC Revised 2025 Timetable: Union Public Service Commission (UPSC) has declared UPSC Revised 2025 Timetable. Candidates can go through the Following Time Table.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 2025 च्या परीक्षा आणि विविध भरती चाचण्यांसाठी परीक्षा दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार UPSC परीक्षेची तयारी करत आहेत ते येथून UPSC परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर तपासू शकतात आणि त्यानुसार तयारी करू शकतात. UPSC परीक्षा कॅलेंडर 2025 शी संबंधित सर्व तपशील खाली दिले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
UPSC Annual Calendar 2024
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 2024 आणि 2025 च्या परीक्षा आणि विविध भरती चाचण्यांसाठी परीक्षा दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार UPSC परीक्षेची तयारी करत आहेत ते येथून UPSC परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर तपासू शकतात आणि त्यानुसार तयारी करू शकतात. UPSC परीक्षा कॅलेंडर 2024 आणि UPSC वार्षिक कॅलेंडर 2025 शी संबंधित सर्व तपशील खाली दिले आहेत. UPSC ने 25 एप्रिल 2024 रोजी UPSC परीक्षा कॅलेंडर 2025 जारी केले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) पुढील वर्षी २०२५ मध्ये होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसह विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. ‘यूपीएससी’ मार्फत परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नियोजनपूर्वक अभ्यासासाठी मदत होणार आहे. संयुक्त जिओ-सायंटिस्ट, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, सीबीआय, सीआयएसएफ, एनडीए, सीडीएस, आयईएस/आयएसएस आणि इतर परीक्षांसाठी अर्ज नोंदणी करणे तसचे परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यूपीएससीच्या https://upsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकानुसार नागरी सेवा आणि भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा-२०२५ साठी दि. २२ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत उमेदवारांना नोंदणी करता येईल. त्यानंतर दि. २५ मे रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे. पूर्वपरीक्षेत यशस्वी उमेदवारांसाठी नागरी सेवा मुख्य परीक्षेचे दि. २२ ऑगस्ट तसेच वनसेवा मुख्य परीक्षा दि. १६ नोव्हेंबर रोजी सुरू होईल.
NDA प्रवेश परीक्षेचे एप्रिलमध्ये आयोजन (NDA Exam Dates in April 2024)
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी (एनडीए / एनए) परीक्षा आणि कम्बाइड डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) परीक्षांसाठी दि. ११ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान नोंदणी करता येईल. त्यानंतर नोंदणीकृत उमेदवारांची परीक्षा दि. १३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षा (ईएसई प्रिलिम्स २०२५) साठी दि. १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अर्ज करता येतील आणि त्यानंतर दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे. त्यामध्ये पात्र उमेदवारांची दि. २६ जून रोजी मुख्य परीक्षा पार पडेल. संयुक्त जीओ सायंटिस्ट पूर्वपरीक्षा दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी, तर मुख्य परीक्षा दि. २१ जून रोजी आहे. संयुक्त वैद्यकीय सेवापरीक्षा दि. २० जुलै रोजी होणार आहे.
लोकसेवा आयोगाची (यूपीएससीची) स्थापना १ ऑक्टोबर, १९२६ला नवी दिल्ली येथे झाली. १९३५च्या कायद्यानुसार आयोग ‘फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन’ या नावाने ओळखला जाऊ लागला. स्वातंत्र्यानंतर उत्तम प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी भारतीय संविधानाच्या कलम ३१५ नुसार संपूर्ण देशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. हा आयोग मंत्रालयातील कर्मचारी व प्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली येतो. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आयोगाचे अध्यक्ष व १० सदस्यांची समिती असून, त्यांची निवड राष्ट्रपतींकडून केली जाते. यातील काही सदस्य नागरी सेवेतील उच्च पदस्थ अधिकारी, निवृत्त अधिकारी असतात. हा स्वायत्त आयोग आहे. शासनाने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असते. यासाठी योग्य सक्षम, बुद्धिमान, प्रामाणिक, निर्णयक्षम, गतिमान, कुशल प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड आयोग करतो. त्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतो. आयोगाद्वारे दरवर्षी देशातील वेगवेगळ्या सेवांच्या भरतीसाठी ७२ केंद्रांवरून परीक्षा घेतली जाते.
Document | Date of Upload |
---|---|
Annual Calendar 2025 | 25/04/2024 |
Revised Annual Calendar 2024 | 19/04/2024 |
UPSC अंतर्गत येणाऱ्या परीक्षा आणि त्यांच्या तारखा
१) भारतीय अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा: १८ फेब्रु, २०२४
२) भू-वैज्ञानिक व भूगर्भशास्त्रज्ञ पूर्व परीक्षा: १८ फेब्रु. २०२४
३) सीआयएसएफ एसीई एलडीसीई परीक्षा १० मार्च २०२४
४) सी. डी. एस. (एक) २०२४ परीक्षा २१ एप्रिल २०२४
५) एनडीए अँड एनए (एक) परीक्षा २१ एप्रिल २०२४
६) केंदीय नागरी सेवा पूर्व परीक्षा : २६ मे २०२४
७) भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा : २६ मे २०२४
८) एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा : १४ जुलै २०२४
९) सी. ए. पी. एफ. परीक्षा : ४ ऑगस्ट २०२४
१०) सी. डी. एस. ।। परीक्षा : १ सप्टेंबर २०२४
११) एनडीए व एनए ॥ परीक्षा : १ सप्टेंबर २०२४
१२) केंद्रीय नागरी सेवा मुख्य परीक्षा : २० सप्टेंबर २०२४
१३) एनडीए व एनए ॥ परीक्षा १ सप्टेंबर २०२४
१४) भारतीय वनसेवा मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०२४
१५) एस. ओ. / स्टेनो एलडीसीई ७ डिसेंबर २०२४
विद्यार्थी व पालक वर्गातील स्पर्धा परीक्षेविषयी सातत्याने वाढणारी जागृती, मार्गदर्शन आणि संदर्भ साहित्याची स्थानिक पातळीवरील उपलब्धता, स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याचा चढता आलेख या पार्श्वभूमीवर यूपीएससी करिअर एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरत आहे. पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षापासूनच सूत्रबद्ध, शिस्तबद्ध अभ्यास केल्यास यशस्वी होणे शक्य आहे.
UPSC Exam Annual Calendar 2024: The Union Public Service Commission has announced the dates for the 2024 exams. This calendar is available on upsc.gov.in. These examinations will start from UPSC Examination Engineering Service (Primary) Examination. Further details are as follows:-
यूपीएससी अंतर्गत निवड होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यूपीएससीने शैक्षणिक वर्ष २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करता येणार आहे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस प्रीलिम्स परीक्षा २०२४ आणि आयएफएस परीक्षा २६ मे २०२४ रोजी असेल. या परीक्षेचे वेळापत्रक हे यूपीएसीच्या अधिकृत वेबसाइटवर चेक करु शकता. मिळालेल्या माहितीनुसार हे यूपीएससीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अर्ज (Application) करण्याची शेवटची तारीख ही ५ मार्च आहे. सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०२४ मध्ये असेल. यूपीएससीची नागरी सेवा, भारतीय वन सेवा आणि NDA, NA पर्यंतच्या सर्व प्रमुख परीक्षांची (Exam) संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे.
UPSC Exam Timetable 2024
यूपीएससीची नागरी सेवा आणि भारतीय वन विभाग सेवांची पूर्व परीक्षा ही २६ मे २०२४ रोजी घेण्यात येईल. तर नागरी सेवा मुख्य परीक्षा २० सप्टेंबर २०२४ पासून आणि IFS मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.
Table of Contents