बारावी परीक्षेचे उत्तरपत्रिका संकलन ठप्प!!!

Maharashtra HSC Result 2022

Maharashtra HSC Result 2022

Maharashtra HSC Result 2022: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावींच्या लेखी परीक्षा सुरू आहेत. बारावीचे पेपर चार मार्च तर, दहावी पेपर १५ मार्चपासून सुरू झाले. याच दरम्यान राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने एसटी बंद आहेत. परीक्षेचे होम सेंटर असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या नाहीत. मात्र, आता परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीत संप अडचणीचा ठरतो आहे. तपासणीकांकडून जमा होणाऱ्या उत्तरपत्रिका मंडळ कार्यालयात कशा पोहचवायच्या असा प्रश्न अनेक मॉडरेटरांना पडला आहे.

एसटी बंदचा परिणाम दहावी, बारावी परीक्षेतील (HSC Exam 2022) उत्तरपत्रिकांच्या संकलनावरही झाला आहे. उत्तरपत्रिकांची ने-आण टपालाने होते. बहुतांशी शिक्षक ग्रामीण भागातील असल्याने उत्तरपत्रिका पोहचणे, तपासून पुन्हा मंडळापर्यंत पोहचवणे शिक्षक, मॉडरेटरांना अडचणीचे ठरते आहे. औरंगाबाद विभागात दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची संख्या २२ लाखांच्या घरात असून या उत्तरपत्रिकांच्या संकलनाचे नियोजन बिघडल्याचे सूत्रांनी सांगितले. एसटी बंद असल्याने आणि प्रवासाची साधने व उपलब्धता कमी आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका जमा करणे व मंडळाकडे जमा करणे अडचणी ठरत असल्याचे अनेक शिक्षक मॉडरेटरांनी सांगितले. उत्तरपत्रिकांचे गठ्ठे नेण्यासाठी खासगी वाहने किंवा इतर वाहनांची व्यवस्था करावी लागते आहे. पेपर संपला की, दुसऱ्या दिवसापासून तपासणीची प्रक्रिया सुरू होते. कस्टोडियनच्या नियंत्रणाखाली उत्तरपत्रिकांचे वितरण होते. कस्टडीतून मॉडरेटरांकडे उत्तरपत्रिका तपासणीसाठी दिल्या जातात. त्यांच्याकडून तपासणीकांकडे जाते. तपासणीकांडून पुन्हा मॉडरेटरकडे उत्तरपत्रिका येतात व मॉडरेटर विषय शिक्षकांकडून जमा झालेल्या उत्तरपत्रिका विभागीय मंडळ कार्यालयात जमा करतात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विभागात २२ लाख उत्तरपत्रिका 

  • विभागात दहावी, बारावीच्या तपासणीसाठी असलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या सुमारे २१ लाख २८ हजार ३३८ एवढी आहे.
  • विभागातून दहावीला परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ८५ हजार ४३४ तर, बारावीला १ लाख ६९ हजार २८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
  • दहावीची परीक्षा २ हजार ४४७ शाळांमधून देत आहेत.
  • बारावीची परीक्षा विद्यार्थी १ हजार २६३ उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातून देत आहेत.
  • लातूर विभागात दहावीची परीक्षा १ लाख १० हजार ३९२ तर बारावीची परीक्षा ९२ हजार ३३ विद्यार्थी देत आहेत.
  • मराठवाड्यात उत्तरपत्रिकांची संख्या ३५ लाखांपेक्षा अधिक असल्याचे अधिकारी सुत्रांनी सांगितले.
  • या उत्तरपत्रिकांच्या नियोजनाच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.

शिक्षक मंडळात; निकाल लांबणार! 

विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिकेवर टाकलेला बहिष्कार आणि त्यासह आता एसटी बंदचा बसलेला फटका यामुळे निकाल लांबणीवर पडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. उत्तरपत्रिकांचे संकलन एसटी बंदमुळे काहीसी विस्कळीत झाले आहे. याबाबत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंडळ सचिवांची भेट घेतली. उत्तरपत्रिका संकलनाच्या अडचणी मांडत उत्तरपत्रिका संकलनाचे काम मंडळाने जिल्हा, तालुकास्तरावर करावे अशी मागणी केली.


Maharashtra Hsc Students Get Extension For Marksheet 

Maharashtra HSC Result 2021  : The deadline for submission of options as a special case has been extended till 15th December, 2021 for the students who have not been able to submit the option for the marks of 12th class improvement scheme.

बारावी श्रेणीसुधार योजनेच्या गुणपत्रिकेसाठी विकल्प सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून विकल्प सादर करण्यास १५ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

The board said in a statement that after the results were announced, the period for replacement of revised marks was extended to six months instead of one month if the students enrolled under the grade improvement scheme applied for revised marks. However, in view of the situation created by Kovid and in the interest of the students, the deadline for submission of options for the February-March 2020 and November-December 2020 examinations has been extended till December 15, 2021 as a special case for the students who have entered under the grade improvement scheme.

काय आहे श्रेणीसुधार योजना (Class Improvement Scheme)?

ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत आणि त्यांना गुण वाढवण्याची संधी हवी आहे, त्यांना राज्य मंडळ एक नव्हे तर दोन परीक्षांमध्ये पुन्हा बसण्याची संधी देते.


Maharashtra HSC Results 2021 | HSC Name Wise Result 2021 | HSC School wise Results 2021

आपला रोल नंबर आणि आईचे नाव एंटर करावे आणि View Result वर क्लिक करा !!

महाभरती , महाराष्ट्राचे आपले मराठी रोजगार पोर्टल !!

निकाल लिंक 1.  https://hscresult.11thadmission.org.in

निकाल लिंक2. https://msbshse.co.in

निकाल लिंक3. hscresult.mkcl.org

निकाल लिंक4. mahresult.nic.in

निकाल अल्टर्नेट लिंक ५

या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

विद्यार्थ्यांना परीक्षेआधी मिळालेल्या सीट नंबरनुसार निकाल पाहता येणार आहे. गेले अनेक दिवस राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. विद्यार्थ्यांचे पुढील पदवी प्रवेश किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश या निकालावर अवलंबून असल्याने या निकालाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले होते.

Maharashtra HSC Result 2021 Check Nowमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

मंडळाच्या परिपत्रकानुसार, ‘सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.१० वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ.१२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.’

 

या निकाल संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

निकाल कसा लावणार

इयत्ता 10 वीच्या गुणांना 30 टक्के भारांश

  • दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.

इयत्ता अकरावी 30 टक्के भारांश

  • इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण

इयत्ता बारावीसाठी 40 टक्के भारांश

  • बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील

31 जुलैपूर्वी निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

 


Maharashtra HSC Result 2021- Result Date – बारावी निकाल ३१ जुलैच्या आत लावावा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. मात्र राज्य मंडळाच्या संकेतस्थळाचा गोंधळ, मुंबईत दोन दिवस झालेला मुसळधार पाऊस पाहता निकाल वेळेत लागणार नाही, अशी चर्चा रंगली होती. मात्र बुधवारी रात्रीपर्यंत बारावी निकालाचे काम ८३ टक्के पूर्ण झाले असून, निकाल वेळेत जाहीर होईल असे मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.

शालेय शिक्षण विभागाने बारावीच्या शिक्षकांना २१ जुलैपर्यंत मंडळाच्या कम्प्युटर प्रणालीमध्ये विषयनिहाय गुण भरण्याची मुदत दिली होती. परंतु हा कालावधी अपुरा असल्यामुळे त्यांना चार दिवसांचा अवधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यानंतर ही मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली.

शिक्षण विभागाने बारावीच्या शिक्षकांना मूल्यमापन व गुणतक्ते वर्गशिक्षकाकडे सादर करण्यासाठी सात दिवस, तर वर्गशिक्षकांना परीक्षण व नियमन करण्यासाठी नऊ दिवस दिले होते. मात्र संकेतस्थळाच्या अडचणीमुळे काम पूर्ण होऊ शकत नसल्याचे समोर आले. बुधवारी दिवसभर सर्व्हर डाऊन असल्याने शिक्षक गुण अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करू शकले नव्हते. त्यातच गेले दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी व विशेषतः कोकण पट्ट्यात, मुंबई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून शिक्षकांना आपापल्या शाळा-कॉलेजांत पोहोचणे शक्य झालेले नाही. पुढील चार दिवस असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड