राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पॉलिटेक्निकच्या सत्र परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर | MSBTE Diploma Exam Time Table

MSBTE Diploma Exam Time Table

MSBTE Diploma Exam Time Table 2024

MSBTE Diploma Exam Time Table: राज्यात येत्या २० नोव्हेबरला होत असलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पॉलिटेक्निकच्या (तंत्रनिकेतन पदविका) प्रात्यक्षिक परीक्षांचे परीक्षांचे सुधारित वेळापत्रक महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षणमंडळाने जाहीर केले आहे. २० नोव्हेंबरला होणारे प्रात्यक्षिक ते २१ नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यंदा राज्यात एकूण सुमारे ४००हून अधिक असलेल्या पॉलिटेक्निक संस्थामध्ये १ लाखाहून अधिक प्रवेश क्षमता आहे. तंत्रशिक्षणातील पदविका हा रोजगारक्षम अभ्यासक्रम म्हणून एक उत्तम पर्याय ठरत असल्याने दहावी उतीर्ण विद्यार्थी पसंती या अभ्यासक्रमांना देत आहेत. गतवर्षी प्रवेश झालेल्या अभियांत्रिकी पदविका, औषधनिर्माणशाख पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रथम वर्ष वगळता इतर हिवाळी सत्र परीक्षा ३ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. तर, प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक निवडणुकीमुळे बदलण्यात आले आहे. आता या परीक्षा २० नोव्हेंबरला मतदान असल्याने परीक्षांना २१ नोव्हेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षांना सुरवात होणार आहे.

सुरूवातीला द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचे नियोजन असून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन नंतर केले जाणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे. नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तंत्रशिक्षणातील पदविका हा रोजगारक्षम अभ्यासक्रम म्हणून एक उत्तम पर्याय ठरत असल्याने दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांनी यंदाही या अभ्यासक्रमांना पसंती दर्शवल्याचे दिसत आहे. तब्बल ९५ हजार २४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

 

 

MSBTE Diploma Exam Time Table: राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे (एमएसबीटीई) अभियांत्रिकी पदविका, औषधनिर्माणशाख पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष वगळता इतर हिवाळी सत्र परीक्षा ता. तीन डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान होणार आहेत. तर, प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक निवडणुकीमुळे बदलण्यात आले असून २१ नोव्हेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षांना सुरवात होणार असून सध्या तोंडी परीक्षा महाविद्यालय स्तरावर सुरू आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

एमएसबीटीईच्या छत्रपती संभाजीनगर विभागात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव हे पाच जिल्हे असे मिळून तेरा जिल्हे विभागाअंतर्गत आहेत. १ लाख ७४ हजार ९२९ विद्यार्थी १३ जिल्ह्यांतून परीक्षा देणार आहेत. यात नियमित विद्याथ्यांसह पुनपरीक्षार्थीची संख्या मोठी आहे.

पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून डी फार्मसीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे. विभागात एकूण ५४८ संस्था आहेत. औषधनिर्माण शास्त्र पदविकेचे ३०५, तंत्रनिकेतन १४७ तर अल्प मुदतीचे अभ्यासक्रम असलेल्या ९३ संस्था आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विभागात २२८ परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी एमएसबीटीईकडून भरारी पथकांची नियुक्ती केली जात आहे. मंडळाकडून लेखी परीक्षेची तयारी सुरू असून महाविद्यालय स्तरावर तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांची तयारी करण्यात येत आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा २० नोव्हेंबरपासून सुरू होणार होत्या. निवडणुकीमुळे त्यात बदल करण्यात आला. २१ नोव्हेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. त्यात सुरवातीला द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचे नियोजन असून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन त्यानंतर केले जाणार आहे, असे एमएसचीटीईकडून सांगण्यात आले.

तपशील पूर्व नियोजित तारीख बदलानंतरची तारीख
प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होण्याची तारीख २० नोव्हेंबर २१ नोव्हेंबर
परीक्षेचे नियोजन द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी प्रथम, त्यानंतर प्रथम वर्षाचे विद्यार्थी द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी प्रथम, त्यानंतर प्रथम वर्षाचे विद्यार्थी
अधिकृत माहिती एमएसचीटीई द्वारे एमएसचीटीई द्वारे

एमएसचीटीईच्या सूचनेनुसार, निवडणुकांमुळे प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.


MSBTE Diploma First Semester Exam Schedule 

MSBTE Diploma Exam 2021: The first component test examinations of the students admitted to the diploma courses in the academic year 2021-22 will start from 10th November. The examinations are being conducted in phases by the Board of Technical Education and the third, fifth and seventh examinations will be held from November 10 to 12. Further details are as follows:-

राज्यभरातील पदविका अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या घटक चाचणी परीक्षा १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तंत्रशिक्षण मंडळामार्फत या परीक्षांचे टप्प्याटप्प्याने आयोजन करण्यात आले असून, १० ते १२ नोव्हेंबरदरम्यान तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या सत्राच्या परीक्षा होणार आहेत. २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान पहिल्या आणि तिसऱ्या सत्रामध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत.

याच कालावधीत वार्षिक पद्धतीच्या ‘एआयसीटीई’ व ‘नॉन एआयसीटीई’ अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. १३ ते १८ डिसेंबरदरम्यान फार्मसी पदविकेच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे, तर १५ ते १७ डिसेंबरदरम्यान ‘एआयसीटीई’ व ‘नॉन एआयसीटीई’ वार्षिक अभ्यासक्रमांना नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत.

या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून, विद्यार्थी लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅब्लेट या माध्यमातून त्यांच्या घरातून किंवा अन्य ठिकाणाहूनही या परीक्षा देऊ शकणार आहेत. बहुपर्यायी स्वरुपाचे प्रश्न या परीक्षेत विचारले जाणार आहेत. ‘एमएसबीटीई’मार्फत २७ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याची सूचना देण्यात आली होती. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले.


MSBTE Diploma Exam 2021 : Diploma examinations conducted by the Maharashtra State Board of Technical Education will be held in July-August. The board has informed that the students will be able to fill up the application by May 12.

MSBTE Diploma Exam 2021 : MSBTE मार्फत घेतल्या जाणाऱ्या डिप्लोमाच्या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या डिप्लोमाच्या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहेत. विद्यार्थ्यांना १२ मेपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचे मंडळामार्फत सांगण्यात आले आहे.

या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांना १२ मेपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचे मंडळामार्फत सांगण्यात आले आहे. ‘एमएसबीटीई’मार्फत वेबसाइटवरील स्टुडंट लॉग इन मध्ये विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी हा परीक्षा अर्ज भरताना स्वत:चा मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी भरणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्ममध्ये भरलेल्या मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीवर परीक्षाविषयक माहिती पाठवली जाणार असल्याने, या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांनी अचूकपणे नमूद कराव्यात.

प्रथम व द्वितीय घटक चाचणी परीक्षा ‘एमसीक्यू’ बेस्ड ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, याबाबतची अधिक माहिती ‘एमएसबीटीई’च्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड