CSIR UGC NET चा निकाल जाहीर
UGC Net Exam 2021 Update - ugcnet.nta.nic.in
UGC Net Exam 2021 Update : csir ugc net result june 2020 released at nta ac in – NTA CSIR NET Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सीएसआयआर यूजीसी नेट (CSIR UGC NET) चा निकाल जाहीर केला आहे. एनटीएच्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि csirnet.nta.nic.in वर निकाल जाहीर केला आहे. या वृत्तात दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करूनही तुम्ही निकाल तपासू शकतात.
डायरेक्ट लिंक वर क्लिक केल्यानंतर एनटीए सीएसआयआर निकालाचे पेज उघडेल. तेथे आपला अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख, स्क्रीन वर दिसणारी सिक्युरिटी पिन भरून सबमिट करा. तुमचा निकाल स्क्रीन वर दिसेल. निकाल डाऊनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआऊट घेऊन ठेवा.
ही परीक्षा १९, २१ आणि २६ नोव्हेंबर २०२० रोजी देशभरात आयोजित करण्यात आली होती. तामिळनाडू आणि पुद्दुचेरी मध्ये वादळ आल्यामुळे ही परीक्षा ३० नोव्हेंबर २०२० ला घेतली होती. परीक्षा संगणकीकृत मोडवर घेण्यात आली होती.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निकाल डाउनलोड – http://bit.ly/2NAd9mq
सोर्स : म. टा.
UGC Net Exam 2021 Update at ugcnet.nta.nic.in – केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhariyal Nishank) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (National Eligibility Test) म्हणजे नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे केले जाते. रमेश पोखरियाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन परीक्षेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट परीक्षेचे आयोजन केले जाते.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (University Grants Commission) वतीनं नॅशनल टेस्टिंग एजन्सी नेट परीक्षेचे आयोजन करते. यंदाची नेट परीक्षा 2 मेपासून ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यास पात्र ठरतात. विद्यार्थ्यांना यासाठी पदव्युत्तर परीक्षा विहीत गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
2 मे पासून ऑनलाईन परीक्षा
रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार यूजीसी-नेट परीक्षा 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 मे रोजी आयोजित केली जाणार आहे. (UGC-NET Exam Date) जाहीर करताना रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय पात्रता परीक्षा यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेतली जात होती. त्यानंतर परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सीबीएसईला देण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन झाल्यानंतर नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाऊ लागली.
यूजीसी नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यंना www.nta.ac.in किंवा https://ugcnet.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 2 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 पर्यंत परीक्षेचे अर्ज भरता येणार आहेत. तर, 3 मार्च रोजी परीक्षा फी भरता येईल. विद्यार्थ्यानी अधिक माहितीसाठी वरील वेबसाईटला भेट द्यावी.