काय असेल JEE Main आणि NEET परीक्षेचा अभ्यासक्रम? जाणून घ्या…
JEE, Neet Exam Syllabus
JEE, Neet Exam Syllabus : JEE, Neet exam 2021 syllabus to remain unchanged for 2021 announced education ministry – इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात JEE आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या NEET परीक्षेसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना विचारण्याच येणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
JEE Main 2021 चा सिलॅबस मागील वर्षीप्रमाणेच असेल. विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायॉलॉजीमधील प्रत्येकी २५ प्रश्न सोडवायचे असतील.विचारण्यात आलेल्या प्रश्नांची एकूण संख्या ९० असेल. या ९० पैकी ७५ प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचेच आहेत. NEET 2021 परीक्षेचा नेमका पेपर पॅटर्न कसा असेल ते अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र ज्या पद्धतीने देशातील अनेक राज्यांमध्ये बोर्डाचा सिलॅबस कमी केला आहे, ते पाहता नीट परीक्षेसाठी देखील जेईई मेन प्रमाणेच निर्यण होण्याची दाट शक्यता आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
फेब्रुवारी महिन्यातील २३, २४, २५ आणि २६ या तारखांना जेईई मेन २०२१ चा पहिला टप्पा पार पडणार आहे. देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य सीएफटीआय संस्थांमधील अभियांत्रिकीच्या यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदा तब्बल चार वेळा ही परीक्षा होणार आहे. फेब्रुवारीव्यतिरिक्त मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात या परीक्षेचे अन्य तीन टप्पे पार पडणार आहे.
सोर्स : म. टा.