RRB NTPC CBT 2 चे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड

RRB NTPC Admit Card

RRB NTPC CBT 2 Admit Card 2022

RRB NTPC Admit Card: Railway Recruitment Board has announced the admit card for CBT 2 for Non-Technical Popular Category Levels 2, 3, and 5. visit https://rrbcdg.gov.in/ to download the admit card.

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डातर्फे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी लेव्हल २, ३ आणि ५ साठी सीबीटी २ चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना रेल्वे बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्राशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशपत्रासोबत आधार कार्ड आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • आरआरबीद्वारे एनटीपीसी २, ३ आणि ५ साठी भरती परीक्षा १२ जून ते १७ जून २०२२ या कालावधीत आयोजित केली जाईल.
  • सीबीटी १ परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार RRB ची अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
  • बोर्डाने नुकतीच परीक्षेची तारीख जाहीर केल्यानंतर विद्यार्थी त्यांच्या प्रवेशपत्राची वाट पाहत होते.
  • आरआरबीने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, चंदीगड, मुझफ्फरपूर, रांची, भुवनेश्वर, बिलासपूर, गोरखपूर, सिकंदराबाद आणि मुंबई येथे वेतन स्तर ५ परीक्षा १२ जून, स्तर २ परीक्षा १३ जून आणि वेतन स्तर ३ परीक्षा १४ जून २०२२ रोजी होणार आहे.
  • तर १५,१६ आणि १७ जून २०२२ रोजी गुवाहाटी, अजमेर, काश्मीर, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता, सिलीगुडी आणि इतर ठिकाणी परीक्षा होणार आहे.
  • सीबीटी १ मध्ये यशस्वी झालेले उमेदवार सीबीटी २ मध्ये उपस्थित राहू शकतील.
  • खाली दिलेल्या सोप्या चरणांचे अनुसरण करून तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

How to Download RRB NTPC CBT 2 Admit Card 2022 

  • सर्वप्रथम RRB च्या अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर जा.
  • होमपेजवर, NTPC CBT 2 साठी E-Call Letter For Pay Level २, ३ आणि ५ लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
  • तुमच्या स्क्रीनवर प्रवेशपत्र दिसेल.
  • तुम्ही ते डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता किंवा डाउनलोड पर्यायावर क्लिक करून प्रिंट आउट घेऊ शकता.

अधिकृत वेबसाईट – rrbcdg.gov.in

प्रवेशपत्राशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशपत्रासोबत आधार कार्ड आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवणे बंधनकारक आहे. बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, उमेदवारांचे आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण केले जाईल. त्यानंतर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल. ज्या उमेदवारांचे कॉल लेटर अद्याप मिळालेले नसेल त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. प्रवेशपत्र पेपरच्या ३-४ दिवस आधी दिले जाईल. तसेच, प्रवेशपत्रात काही चूक असल्यास, तुम्ही RRB च्या अधिकृत साइटला भेट देऊन तुमची तक्रार नोंदवू शकता याची उमेदवारांनी नोंद घ्या.


RRB NTPC Admit Card : रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) अंतर्गत RRB NTPC 6 व्या टप्प्यातील परीक्षांच्या प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहे. RRB NTPC 6 व्या टप्प्यातील परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक प्रादेशिक आरआरबी संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी 1, 3, 4, 6, 7 आणि 8 एप्रिल 2021 रोजी आयोजित केली जाईल. प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंक वरून किंवा अधिकृत वेबसाईट वरून डाउनलोड करावे.

RRB NTPC 6 व्या टप्प्यातील परीक्षांच्या तारखा जाहीर

  • परीक्षेचे नाव – RRB NTPC परीक्षा फेस 6
  • संगणक आधारित चाचणी तारीख – 1, 3, 4, 6, 7 आणि 8 एप्रिल 2021 

Important Links For RRB NTPC Admit Card

प्रवेशपत्र डाउनलोड : http://bit.ly/38zoBX2

RRB NTPC Admit Card: रेल्वे भरती बोर्डाने (RRB) नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी पोस्ट (NTPC) फेज २ ऑनलाइन परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. RRB NTPC Phase 2 ऑनलाइन परीक्षा १६ जानेवारी २०२१ ते २१ जानेवारी २०२१ या कालावधीत देशभरात आयोजित करण्यात येणार आहे.

ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते त्यांचे अॅडमिट कार्ड अधिकृत प्रादेशिक संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतात. बोर्डाद्वारे ३५ हजार पदांसाठी सिलेक्शन राउंड १ अंतर्गत संगणकीकृत परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १६ जानेवारी २०२१ पासून आयोजित केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २७ लाख उमेदवार एनटीपीसी परीक्षेत सामील होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २३ लाख उमेदवार सामील झाले होते.

आरआरबी एनटीपीसी अॅडमिट कार्ड असे करा डाऊनलोड

येत्या शनिवार १६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एनटीपीसी फेज २ सीबीटी १ परीक्षेचे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना संबंधित रेल्वे भरती बोर्डाच्या वेबसाइटवर भेट द्यावी. अॅप्लिकेशन नंबर आदी माहिती भरून सबमीट करावे. मग नव्या पेजवर आपली माहिती भरून सबमीट करावी. यानंतर तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करून सेव्ह करून ठेवावे आणि एक प्रिंटही काढून ठेवावे.

परीक्षा केंद्रावर जाताना ऑनलाइन अॅडमिट कार्डच्या प्रिंटसह एक फोटो आयडी प्रूफही सोबत न्यावा.

Important Links For RRB NTPC Admit Card

प्रवेशपत्र डाउनलोड : http://bit.ly/38zoBX2

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sachin Dharak says

    Reserve Bank of India recruitment for the post of office attendants che admit card kadhi yenaret

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड