SSC HSC Result: दहावी-बारावीचा पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर
SSC HSC Re-Exam Result 2020
SSC HSC Re-Exam Result 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे इयत्ता दहावी आणि बारावीचे पुरवणी परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. दहावीचा निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा निकाल १८.४१ टक्के इतका लागला आहे. बारावीचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ४.७६ टक्क्यांनी घसरला आहे; याउलट दहावीच्या निकालात ९.७४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेला राज्यातून ४१,३९७ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १३,४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीची परीक्षा देणाऱ्या ६९,२७४ विद्यार्थ्यांपैकी १२,७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकाल कुठे पाहाल? – SSC HSC Re-Exam Result 2020
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विभागीय मंडळनिहाय दहावी, बारावीची उत्तीर्णता
मंडळ — दहावी — बारावी
- पुणे — ३०.७६ — १४.९४
- नागपूर — २९.५२ — १८.६३
- औरंगाबाद — ३९.११ — २७.६३
- मुंबई — २९.८८ — १६.४२
- कोल्हापूर — ३०.१७ — १४.८०
- अमरावती — ३२.५३ — १६.२६
- नाशिक — ३७.४२ — २३.६३
- लातूर — ३३.५९ — २२.०५
- कोकण — ३४.०५ — १४.४२
- एकूण — ३२.६० — १८.४१
गुणपडताळणी कधी?
ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २४ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
- गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – २४ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१
- उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करण्याची मुदत – २४ डिसेंबर २०२० ते १२ जानेवारी २०२१
गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्जांच्या थेट लिंक्स पुढीलप्रमाणे –
दहावीसाठी – http://verification.mh-ssc.ac.in/
बारावीसाठी – http://verification.mh-hsc.ac.in/
सोर्स : म. टा.
Table of Contents