एनटीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

NTS Exam

NTS Exam : राष्ट्रीय प्रज्ञा शोध (एनटीएस) परीक्षेसाठी आता ४ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार…

NTS Exam : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञा शोध (एनटीएस) परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३० ऑक्टोबरऐवजी चार नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

राज्यस्तरावरील परीक्षा १३ डिसेंबर रोजी तर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पुढील वर्षी १३ जून रोजी होणार आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.राष्ट्रीय परीक्षेतून देशभरातील २००० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य शाखांमध्ये पीएचडी पदवी प्राप्त करेपर्यंत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, इंजिनियरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट आणि लॉ या विद्याशाखांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती पदव्युत्तर पदवी पर्यंतच दिली जाते.

राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता दहावीत शिकत असलेले नियमित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या परीक्षेसाठी पात्र आहेत. त्यासाठी वयाची उत्पन्नाची किंवा किमान गुणांची अट नाही.तसेच कोणतीही पूर्वपरीक्षा ही देण्याची गरज नाही, असेही परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड