विद्यार्थ्यांनो.. आयटी, वाणिज्‍य क्षेत्रात करिअर करायचंय?

Degree Education Options For Students

Degree Education Options For Students : विद्यार्थ्यांनो.. आयटी, वाणिज्‍य क्षेत्रात करिअर करायचंय? पदवी शिक्षणाचे ‘हे’ अनोखे पर्याय

Degree Education Options For Students : बारावीनंतरच्‍या काही पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे. कुठल्‍याही शाखेतून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आयटी क्षेत्रात करिअर करू इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीबीए (सीए) रूपी मार्ग खुला आहे. विविध विषयांतून बीबीए शिक्षण घेत वाणिज्‍य, व्‍यवस्‍थापन शास्त्र शाखेत करिअरचा पर्याय उपलब्‍ध आहे. सध्या या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया संस्‍था, महाविद्यालय स्‍तरावर सुरू आहे.

बीबीए (सीए), बी. एस्सी. कॉम्‍प्‍युटर प्रवेशप्रक्रिया सुरू

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आयटी क्षेत्रात गेल्‍या काही वर्षांत चांगले करिअर घडविल्‍याची अनेक उदाहरणे असल्‍याने विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे कल वाढत आहे. परंतु, अभियांत्रिकी शिक्षण न घेता कला, वाणिज्‍य किंवा विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थ्यांनाही आयटी क्षेत्रात करिअरची संधी खुली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत बीबीए (सीए) या शिक्षणक्रमास प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ होऊ शकतो. सत्र पद्धतीने तीन वर्षांच्या या पदवी अभ्यासक्रमानंतर पुढे एमसीए या पदव्‍युत्तर पदवी शिक्षण घेण्याचा पर्याय खुला असतो. तसेच, पदवी शिक्षण घेतानाच अन्‍य विविध कौशल्‍ये आत्‍मसात करता येऊ शकतात. क्रेडिट बेस चॉइस सिस्टिम असल्‍याने विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या कामगिरीच्‍या जोरावर यश मिळविता येऊ शकते.

बीबीए, बीसीएसमध्येही संधी

व्‍यवस्‍थापनशास्त्र, वाणिज्‍य शाखेतच करिअर करू इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीबीए या पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्‍ध आहे. या अंतर्गत बारावीनंतर कुठल्‍याही शाखेतील विद्यार्थ्यास प्रवेश मिळविता येऊ शकतो. तर बीबीएमध्ये घेतलेल्‍या विशेष विषयानंतर पुढे एमबीएचे पदव्‍युत्तर पदवी शिक्षण घेता येऊ शकते. पूर्वीचा बीसीएस अर्थात, बी. एस्सी. (कॉम्‍प्‍युटर सायन्‍स) हा देखील करिअरसाठीचा उत्तम पर्याय मानला जातो. विज्ञान शाखेतून गणित विषयासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमास बारा विषय असल्‍याने गंभीरपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच हा विकल्‍प उपयुक्‍त ठरू शकतो.

प्रवेश परीक्षा नसल्‍याने थेट प्रवेश

या अभ्यासक्रमांसाठी केंद्रिभूत पद्धतीची कुठलीही प्रवेश परीक्षा घेतली जात नसल्‍याने महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्‍था पातळीवर प्रवेश दिले जात असतात. ‘मविप्र’तर्फे सध्या केटीएचएम महाविद्यालय वगळता विविध महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बीबीए (सीए) अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयटी क्षेत्रात करिअर करू इच्‍छिणाऱ्या विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाकडे कल वाढत आहे. तीन वर्षे शिक्षणानंतर नोकरी, व्‍यवसायासह पदव्‍युत्तर शिक्षणाचाही पर्याय विद्यार्थ्यांपुढे उपलब्‍ध आहे. -प्रा. ज्ञानेश आहेर, संगणकशास्त्र विभागप्रमुख, सीएमसीएस महाविद्यालय

सोर्स : सकाळ


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड