MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 – अंतिम निकाल जाहीर
MPSC AMVI Mains Result 2022
MPSC AMVI Mains Result 2022
MPSC AMVI Mains Result 2022: Maharashtra Public Service Commission has declared the Assistant Motor Vehicle Inspector Main Exam 2020 final result. The exam was held on the 21st of November 2021. Click on the below link to download the result.
MPSC AMVI Mains Result 2022 Declared
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. सदर परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-२०२० या परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक २१ ऑक्टोबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण २३३ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात येत आहे.
- सदर परीक्षेमध्ये ठाणे जिल्हयातील श्री. साळेकर अभिषेक भास्कर (बैठक क्रमांक – MB001234) हे राज्यातून प्रथम आले आहेत. पुणे जिल्हयातील श्री. गाडे कांतिलाल दिलीप (बैठक क्रमांक – PN006170) हे मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून नांदेड जिल्हयातील श्रीमती सूर्यवंशी सरला विनायकराव (बैठक क्रमांक-PN007309) ह्या प्रथम आल्या आहेत.
- उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
- प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
- शिफारस यादीमध्ये # अशा चिन्हांनी दर्शविलेल्या उमेदवारांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात माजी सैनिक असल्याचा केलेला दावा विचारात घेऊन या उमेदवारांची शिफारस माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या पदावर ते सैनिकी सेवेतील विहित वैध/पुरेसा अनुभव धारण करतात व ते माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या पदासाठी पात्र आहेत आणि त्यांच्याकडे माजी सैनिकांसाठी आवश्यक असलेली सर्व मुळ प्रमाणपत्रे आहेत, हे नियुक्तीपूर्वी शासन स्तरावर होणा-या विनिर्दिष्ट पडताळणीत पात्र ठरण्याच्या अटीच्या अधीन राहून, करण्यात येत आहे.
- प्रस्तुत निकालानुसार अनाथ, खेळाडू, मागास इत्यादींसाठी आरक्षित पदावर शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
- स्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्दयांसदर्भात तसेच अन्य मुद्दयासंदर्भात मा. न्यायालयात | मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
प्रस्तुत अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
MPSC Assistant Motor Vehicle Inspector Main Exam 2020 Final Result
निकाल डाउनलोड करा – https://bit.ly/3SqMCTM
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानी सहाय्यक वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा – २०१७ चे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Table of Contents