आर्किटेक्चरशी संबंधित ऑनलाइन अभ्यासक्रम घरबसल्या
Online Architecture Course
Online Architecture Course : घरबसल्या आर्किटेक्चरशी संबंधित ऑनलाइन अभ्यासक्रम शिकण्याची संधी…
करोनाच्या पार्श्वभूमीवर घरबसल्या आर्किटेक्चरशी संबंधित ऑनलाइन अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महषी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेन (बीएनसीए) तर्फे असे पाच नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. बांबूच्या माध्यमातून विविध रचना, लॅण्डस्केप (भूशास्त्रकला) क्षेत्रातील शाश्वत पद्धती, पारंपरिक साहित्य आणि बांधकाम पद्धती तसेच विविध कलांशी संबंधित संकल्पनांपासून सृष्टीपर्यंत अशा विशेष अभ्यासक्रमांचा समावेश यात केला गेला आहे.
हे सर्व अभ्यासक्रम पाच सप्टेंबर या शिक्षकदिनापासून सुरू होतील, अशी माहिती बीएनसीएच्या ऑनलाइन अभ्यासक्रम प्रमुख डॉ. शुभदा कमलापूरकर यांनी दिली. हे पाचही अभ्यासक्रम निरोगी आणि शाश्वत मूल्यांशी संबंधित आहेत. त्यापैकी बांबूरचनेवरील आणि शाश्वत लॅण्डस्केप पद्धती हा अभ्यासक्रम हा सजीव सृष्टी व पर्यावरणाशी संबंधित आहे, असे त्या म्हणाल्या.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
बांबूरचना अभ्यासक्रमात बांबूच्या पुनर्वापराच्या शक्यता, बांधकामातील शाश्वततेसाठी(टिकाऊपणासाठी) वापर, बांबूची बांधकामातील उपयुक्तता व तंत्रांची माहिती ऑनलाइन सादरीकरणातून आणि तज्ज्ञांच्या मदतीने समजावून दिली जाईल. यातील सहभागी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या छोट्या आकारातील बांबूच्या वस्तू (फर्निचर) तसेच बांबूच्या मोठ्या रचना व आकृतीबंधाविषयी मार्गदर्शनही केले जाईल.
शाश्वत लॅण्डस्केप पद्धतींवरील अभ्यासक्रमात शाश्वत लॅण्डस्केप पद्धतीचा अभ्यास, लॅण्डस्केप डिझाइनच्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणामांचा समावेश असेल. व्याख्याने, केस स्टडीज, व्हर्च्युअल साईट स्टडीज, आर्किटेक्ट, पर्यावरण अभ्यासक, वनस्पती शास्त्रज्ञ व या क्षेत्रात काम करणार्या सर्वांच्या मुलाखतींद्वारे व व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांना हा विषय शिकवला जाईल. हा अभ्यासक्रम हिंदी, मराठी व इंग्रजी भाषांमधून शिकवण्यात येईल.
पारंपरिक वास्तू (इमारत) उभारणीसाठी लागणारे साहित्य व तंत्रज्ञान यावरील अभ्यासक्रमात आपल्याकडील पारंपरिक बांधकामातील ज्ञान व परंपरागत बांधकाम साहित्य व तंत्राचा पर्यावरणाला कमीत कमी बाधा पोहोचेल, यावर विशेष भर असेल. आर्किटेक्चर आणि परफॉर्मिंग आर्टस् (सादरीकरणाच्या कला) दरम्यान आंतर-संबंध आणि प्रभाव या अभ्यासक्रमात संगीत, नाट्य, नृत्य, चित्र अशा विविध कलांमागील संकल्पना, घटक, मूलतत्त्वे, शैली व कलाप्रकार तसेच त्यांचे एकमेकांशी असणारे नाते समजावून सांगितले जाईल. तसेच या सार्याचा आर्किटेक्चर क्षेत्राशी असणारा संबंध उलगडण्यात येईल. त्यातला कलात्मक भाग हा विविध प्रकाराच्या माध्यमातून व सर्जनशील विचारातून सशक्तपणे पोचवण्यात आर्किटेक्चरचा वापर कसा होईल याबाबतही मार्गदर्शन केले जाईल.
संकल्पनेपासून सृष्टीपर्यंत (प्रत्यक्ष निर्मितीपर्यंत) या अभ्यासक्रमात रचना (डिझाइन) या संकल्पनेसंबंधीची मूलभूत समज पक्की केली जाईल. मुळात रचनाही एक प्रक्रिया असून तो केवळ अंतिम उत्पादक घटक नाही, हे विविध अभ्यास व अनुभवांच्या माध्यमातून समजावून सांगितले जाईल.
हे अभ्यासक्रम आर्किटेक्ट सायली अंधारे, डॉ. शुभदा कमलापूरकर, प्रा.महेश बांगड, आर्किटेक्ट नेहा अडकर आणि डॉ. संजीवनी पेंडसे यांच्या समन्वयातून डॉ. कमलापूरकर व प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहेत.
सोर्स : म. टा.