मुंबई विद्यपीठाच्या प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ
Mumbai University FY Admission 2020
Mumbai university FY Admission 2020 : मुंबई विद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ केली आहे…
Mumbai university FY Admission 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या पहिल्या वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशपूर्व नोंदणी करण्यासाठी विद्यापीठाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातील परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे. यापूर्वीदेखील एकदा मुंबईतल्या पावसामुळे विद्यापीठाने प्रवेश पूर्व नोंदणीसाठी मुदतवाढ दिली होती. दरम्यान, या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी दुपारी जाहीर झाली आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना आता ७ ऑगस्ट सकाळी ११ वाजल्यापासून प्रवेश नोंदणीसाठी संकेतस्थळावरील लिंक अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे. हि लिंक विद्यार्थ्यांना १४ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. या लिंकमधून विद्यार्थी आपली प्रवेश नोंदणी करू शकतील. जे विद्यार्थी ७ ऑगस्टपासून प्रवेश नोंदणी करतील त्यांना महाविद्यालयांनी तिसऱ्या गुणवत्ता यादीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादीत समाविष्ट करून प्रवेश प्रकियेत सामील करावे, अशी सूचना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे. विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल त्या महाविद्यालयाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावे लागतील, असेही विद्यापीठाने परिपत्रकात म्हटले आहे. http://mum.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी प्रवेश पूर्व नोंदणी करू शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रवेशांचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
- अर्ज विक्री – २४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२०
- प्रवेशपूर्व नोंदणी (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – २२ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (दुपारी १ वाजेपर्यंत)
- प्रवेश पूर्व अर्जांच्या कॉपीसह प्रवेश अर्ज सादर करणे – २७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (३ वाजेपर्यंत)
- पहिली गुणवत्ता यादी – ६ ऑगस्ट २०२० (सकाळी ११ वाजता)
- कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – ६ ऑगस्ट २०२० ते ११ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
- दुसरी गुणवत्ता यादी – ११ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
- कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १२ ऑगस्ट २०२० ते १७ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
- तिसरी गुणवत्ता यादी – १७ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
- कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १८ ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
- मुदतवाढीनंतर प्रवेश पूर्व नोंदणी – ७ ऑगस्ट २०२० ते १४ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)
प्रवेश पूर्व नोंदणी वेबसाईट – http://mum.digitaluniversity.ac/
मुंबई विद्यापीठ वेबसाईट – https://mu.ac.in/
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची यादी – http://academicaudit.mu.ac.in/AA/college_reps.php
सोर्स : म. टा.
No entrace direct add n