इतिहास विषयात पदवीधर शिक्षण घेतल्यास करिअरच्या संधी!

Career Opportunities Fir History Graduates

इतिहास विषयात पदवीधर शिक्षण घेतल्यास करिअरच्या कोणकोणच्या संधी आहेत? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर इतिहास विषय घेऊन पुरातत्त्व संशोधनशास्त्र, मानववंशशास्त्र, अर्कायव्हिस्ट (दफ्तरपाल), कॉन्झव्‍‌र्हेटर, न्यूमिस्मॅटिक्स आणि म्युझिओलॉजी या क्षेत्रात करिअर करता येतं. या क्षेत्रांची विस्तृत माहिती खालीलप्रमाणे…

इतिहास विषयातून पदवी आणि करिअरच्या संधी

वर्तमानकाळातील मानवी समस्यांची मुळे आपल्याला इतिहासात शोधावी लागतात. विविध देशांमधील आणि देशांतर्गत संघर्ष याची बीजे भूतकाळात सापडतात. आपली संस्कृती, चालीरीती, पूर्वज यांचा मोठा पगडा मानवी जीवनावर आहे. इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करावा लागतो. जुने दस्तावेज, शिलालेख, त्या काळच्या वास्तूंचा (गड, किल्ले, राजवाडे, मंदिरं वगैरे) अभ्यास तसंच उत्खननातून मिळालेल्या वस्तू या साऱ्यांचा मेळ घालत इतिहासाचा अभ्यास करून त्या काळच्या परिस्थितीविषयी, संस्कृतीविषयी भाष्य करता येतं. जगामध्ये विविध भागांमध्ये राहणाऱ्या विविध वंशांच्या संस्कृतींचं रहस्य इतिहासातच शोधावं लागतं. इतिहासतज्ज्ञांना छोट्या-छोट्या गोष्टींवरून इतिहासातील घटनांचा वेध घ्यायचा असतो. इतिहास विषय घेऊन पुढील क्षेत्रामध्ये करिअर करता येईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुरातत्त्व संशोधनशास्त्र

Harappa-Mohenjo-daro image.jpg

हडप्पा-मोहंजोदडोसारख्या लुप्त झालेल्या संस्कृतीचा शोध पुरातत्त्व संशोधकांमुळे लागला. जुने दस्तावेज, शिलालेख, नाणी, वस्तू, हस्तलिखित यांच्या आधारे आणि उत्खननामुळे सापडणाऱ्या वस्तूंच्या कार्बन डेटिंगद्वारे नामशेष झालेल्या संस्कृतीचा, समाजाचा अभ्यास हे संशोधक करतात. ज्या विषयामध्ये संशोधन सुरू असतं, त्यातील प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुरावे शोधावे लागतात. आर्किओलॉजिस्ट हे उत्खननाच्या जागेवर एका टीममध्ये पुरावे, तसंच विविध माहिती एकत्र करण्याचं काम करतात. यानंतरच्या काळामध्ये प्रयोगशाळेत बसून मिळालेल्या माहितीचे, पुराव्यांचे विश्लेषण करण्याचं काम बरेच दिवस चालतं. तसंच या माहितीवर आधारित रिपोर्ट तयार करण्याचं कामही त्यांना करावं लागतं. आर्किओलॉजिस्टच्या कामात आव्हानं खूप आहेत, तसंच त्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. उत्खननात सापडलेले अवशेष स्वच्छ करण्यात, त्याचं विश्लेषण करण्यात अनेक तास घालवावे लागतात.

​मानववंशशास्त्र

मानववंशशास्त्र हे मानवाचा उगम, विकास आणि संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करणारं शास्त्र आहे. हे शास्त्र इतिहास, भूगोल, पुराणवस्तू संशोधनशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र अशा विविध विषयांशी जोडलेलं आहे. भरपूर वाचन, प्रभावी लेखन आणि संशोधनाची आवड असणाऱ्यांसाठी हे क्षेत्र आहे. यात शिक्षण, संशोधन, सल्लागार इत्यादीमध्ये विविध संधी प्राप्त होतात. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बीएच्या अभ्यासक्रमात हा विषय निवडण्यात येतो. तसंच इतिहास, समाजशास्त्र, समाजसेवा, भूगोल, अर्थशास्त्र अथवा भाषा विषय घेऊन बीए केल्यावर पदव्युत्तर (एमए) शिक्षण घेता येतं. आंतरराष्ट्रीय स्तरांवरील संशोधन क्षेत्रातही या विषयाच्या अभ्यासातून संधी प्राप्त होते.

अर्कायव्हिस्ट (दफ्तरपाल)

अर्कायव्हिस्ट म्हणजे जुन्या संदर्भाचं जतन करणारी व्यक्ती जुनी पुस्तकं, वर्तमानपत्रं, नकाशे, छायाचित्रं, फिल्म्स इत्यादी गोळा करून त्याची नीट सूची बनवणं आणि संशोधन करू इच्छिणाऱ्यांना त्यासंबंधी मार्गदर्शन करणं असं यांचं काम असतं. सरकारी यंत्रणा, महामंडळं, शैक्षणिक संस्था, रुग्णालयं, वस्तुसंग्रहालयं, ग्रंथालयं, संशोधन संस्था, व्यक्ती आणि कुटुंबविषयक इत्यादी अनेकजणांची रेकॉर्डस नीट जतन करण्याचं आव्हानात्मक काम करावं लागतं. इतिहास विषयातील आवड, कठोर परिश्रमांची तयारी, जिज्ञासू वृत्ती, नेटकेपणा या गुणांवर या क्षेत्रात यश संपादन करता येतं. विशेषत: इतिहास किंवा ग्रंथशास्त्रात पदवी घेतलेल्यांसाठी विविध पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

​कॉन्झव्‍‌र्हेटर

पुरातन चित्रं, शस्त्रं, भांडी, वस्त्रं, फर्निचर, धातूच्या वस्तू इत्यादी ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा असणाऱ्या वस्तूंचं योग्य जतन होणं आवश्यक असतं. कॉन्झव्‍‌र्हेटर या व्यक्तीला हे काम करावं लागतं. वस्तूंचे मूळ रंग, रूप न बदलता ती दीर्घकाळ टिकावी या दृष्टीने प्रयत्न करणं. त्यासाठी आवश्यक ते दुरुस्ती काम करणं, नोंदी ठेवणं, प्रदूषणापासून दूर ठेवणं इत्यादी कामं याला करावी लागतात. यासाठी प्रयोगशाळांमध्ये किंवा छोट्या वर्कशॉपमध्ये व प्रत्यक्ष साइटवरही काम करावं लागतं.

​न्यूमिस्मॅटिक्स

पूर्वीच्या साम्राज्याचे/ संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे विविध धातूंची व विशिष्ट कोरीव काम किंवा मुद्रा असणारी नाणी. या नाण्यांच्या अभ्यासावर तत्कालीन राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था इत्यादींचे आडाखे बांधणारी ही इतिहासाची शाखा आहे.

म्युझिओलॉजी

म्युझिओलॉजी हे संग्रहालयाचं शास्त्र आहे. यामुळे संग्रहालयातील व्यावसायिकाला त्याची आवश्यकता, व्यवस्थापन संघटन याविषयी माहिती होण्यास मदत होते. यामध्ये म्युझियमचं संकलन, नोंदणी व संशोधन, म्युझियमचं शिक्षण, म्युझियमची मांडणी (प्रदर्शन), म्युझियमचं जतन, मार्केटिंग, म्युझियम आर्किटेक्चर, प्रकाशन, संरक्षण व व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश केलेला असतो. म्युझिओलॉजीच्या अभ्यासक्रमाला विज्ञान शाखेतील, इतिहास/कला इतिहास, फाइन आर्ट्स, आर्किओलॉजीचे पदवीधर प्रवेश घेऊ शकतात. अनेक म्युझियम्स सरकारी संशोधन संस्था, सशस्त्र दलं, पर्यटन विभाग आणि अगदी परराष्ट्र खात्याच्या इतिहास विभागातही काम मिळू शकतं.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड