इंजिनीअरिंग पीजी प्रवेशांसाठी गेट परीक्षा फेब्रुवारीमध्ये
IIT GATE Exam 2021 Will be Held in February
इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘गेट २०२१’ ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा यंदा वेगवेगळ्या टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे परीक्षा समितीचे प्रमुख आयआयटी मुंबईचे प्रा. दीपांकर चौधरी यांनी स्पष्ट केले.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी होणारी ही परीक्षा ५ ते ७ फेब्रुवारी आणि १२ ते १४ फेब्रुवारी अशा सहा दिवसांमध्ये होणार आहे. यंदा या परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत. यात ‘पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीअरिंग’ आणि ‘ह्युमॅनिटीज अॅण्ड सोशल सायन्सेस’ या दोन विषयांचा समावेश करण्यात आल्याने या परीक्षेसाठी एकूण २७ विषय असणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे, असे मतही चौधरी यांनी व्यक्त केले. यंदा या परीक्षेसाठी पात्रता निकषही शिथिल करण्यात आले आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना बारावीनंतर चार किंवा तीन वर्षांचे पदवी शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक होते. आता अखेरच्या वर्षाच्या परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे गुण वाढवण्याची आणखी एक संधी मिळणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या परीक्षेतील बदलांमुळे विद्यार्थ्यांना मानवता आणि सामाजिक विज्ञान या विषयांमध्येही करिअरची संधी मिळणार आहे. देशभरातील आयआयटी तसेच इतर विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कक्षा रुंदावणार असल्याचा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला.
सोर्स : म. टा.