राज्यातील २०२०-२१ साठी १ ली ते १२ वी चा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय

Maharashtra Education Department Decided to Reduce 25 Percent syllabus of 1st to 12th Std

Maharashtra Board Syllabus 2020-21: राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा २५ टक्के अभ्यासक्रम २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंृदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा वेळेवर सुरू करता आलेल्या नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात समस्या निर्माण झाल्याने राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांतील इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रम २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

शासन निर्णयात म्हटले आहे की – ‘शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोविड – १९ या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीचा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, पुणेच्या संचालकांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, तसेच याबाबत शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी आवश्यक प्रसिद्धी द्यावी.’

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Syllabus

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून या निर्णयाची घोषणा केली. तसेच यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर ) देखील जारी झाला आहे.

१५ जून पासून राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरु करण्यास शासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे. दरम्यान ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विविध शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणामधील विविध अडचणी आणि विद्यार्थ्यांवर पडणार ताण या बाबींचा विचार करता शासनाने यापूर्वीच ऑनलाइन शिक्षणासंदर्भात वेळा निश्चित करून दिल्या आहेत. दरम्यान या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर निर्माण होणारा तणाव व दडपण या बाबी लक्षात घेऊन शासनाने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील एकूण पाठ्यक्रमा पैकी २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात आला असून यासंदर्भातची मार्गदर्शक सूचना राज्याचे शैक्षणिक संशोधक परिषदेच्या संचालकांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Suresh kishor gavandi says

    मला जॉब साठी apply करायचा आहे. मला ऑफिस बॉय साठी जॉब हवा आहे कारण मी नववी नापास आहे. मी ज्या ऑफिस मध्ये काम करायचो त्या ऑफिस मधून मला कमी केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड