व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर

Vocational Courses Timetable 2020

Vocational Courses Timetable 2020 – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) व्यावसायिक अभ्यासक्रमांचे सुधारित शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार दि.15 सप्टेंबरपासून वर्ग सुरू होणार असल्याचे जाहीर केले. मात्र महाराष्ट्रात अद्याप व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटीच झाल्या नाहीत. त्यामुळे “एआयसीटीई’ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्ष सुरू होतील, याविषयी सांशकता व्यक्‍त केली जात आहे.

 

“एआयसीटीई’ अंतर्गत अभियात्रिकी, व्यवस्थापन, वास्तुकला, औषधनिर्माणसह अन्य अभ्यासक्रमांचा समावेश होता. “एआयसीटीई’ यापूर्वी जाहीर केलेल्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 सप्टेंबरपासून होणार होती. मात्र करोना संसर्गानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय “एआयसीटीई’च्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले.

 

आता शैक्षणिक वर्ष सुरुवात 15 सप्टेंबरपासून होईल. या पूर्वी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्ट रोजी सुरू होणार होते. “एआयसीटीई’द्वारे राबवल्या जाणाऱ्या मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष 16 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती “एआयसीटीई’ने दिली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Duryodhana Gaikwad says

    मि धदा करु ईचछतो

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड