११ वी प्रवेश दुसरी यादी आज प्रकाशित
11th Admission Pune, Mumbai, Nagpur, Amravati, Nashik, Aurangabad
११ वी प्रवेश दुसरी यादी आज प्रकाशित – अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी 4 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 6 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यातील पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई आणि अमरावती महापालिका क्षेत्रात अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या एकूण 2 लाख 57 हजार 447 जागा रिक्त असून या जागांसाठी दुसऱया गुणवत्ता यादीत 1 लाख 96 हजार 518 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
मुंबई विभागातून दुसऱया यादीसाठी आर्टस्, सायन्स, कॉमर्स आणि एचसीवहीसी शाखेच्या मिळून एकूण 1 लाख 39 हजार 794 जागा असून दुसऱया यादीसाठी एकूण 1 लाख 33 हजार 723 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
पहिल्या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचे कॉलेज नाकारलेल्या 10 हजार 751 विद्यार्थ्यांना या यादीत प्रकेशाची संधी दिली जाणार नाही.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Regular Round-2 Allotment has been published. Time for admission ends on September 06, 2021 (06:00PM). Allotted students are supposed to confirm their admission before that.
शिक्षण संचालनालयाकडून अर्जाचा पहिला भाग १ आॅगस्टपासून भरता येणार असल्याची माहिती नोंदणी सुरू करण्याच्या वेळेसच देण्यात आली. मात्र विभागीय उपसंचालक कार्यालयांकडून अद्याप याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही.
काय आहे मोबाइल अॅप?
विद्यार्थ्यांना अर्ज करणे सुलभ व्हावे या उद्देशाने अॅप सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावर १ आॅगस्टपासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकायचा आहे.राज्य माध्यमिक मंडळाकडे असलेला सर्व तपशील येईल. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
11th Admission Pune, Mumbai, Nagpur, Amravati, Nashik, Aurangabad is now started from 1st July 2020. The Timetable of 11th Admission & round Details are given here. Just go through the given Schedule of 11th Admission 2020. The Registration process For Collges is now begin. For updates & Online Application Forms keep visiting us.
‘कोरोना’ मुळे इयत्ता १०वीचा निकाल उशीरा लागणार असल्याने यंदा केंद्रीय पद्धतीने ११वी प्रवेश करू नयेत, ऑफलाईन प्रवेशास मान्यता द्यावी अशी मागणी शिक्षण संस्थांनी लावून धरली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षण विभागाने ११वी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतची अधिक माहिती www.dydepune.com व इ .११वी ऑनलाईन प्रवेशाच्या https://pune.11thadmission.org.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना
– पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इ .११ वी चे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होतील. या प्रक्रियेत सर्व मान्यता प्राप्त संस्था सहभागी होतील, याची दक्षता घ्यावी
– इ .११ वी चे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने दिल्यास ते अमान्य ठरतील.
– आरक्षणाबाबत एसईबीसी -१२ टक्के व दिव्यांग -०४ टक्के, इसहाऊस कोटा -१० टक्के, व्यवस्थापन कोटा -०५ टक्के, अल्पसंख्यांक शाळांमध्ये कोटा -५० टक्के) याबाबत जागृती करावी.
– कोणत्याही कोट्यातुन प्रवेश हवा असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यास केंद्रीय ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.
– कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यानुषंगाने सर्व नियम पाळणे आवश्यक आहे.
– शाळा/ महाविद्यालयांची नोंदणी सुरु झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करावी. कोणालाही प्रत्यक्षात बोलविण्याची गरज नाही.
– प्रवेश माहिती पुस्तिका छापील स्वरुपात दिली जाणार नाही. ऑनलाईन नोंदणी करताना विद्यार्थ्याना लॉगीन आयडी सह माहिती पुस्तिकेची साॅफ्टकाॅपी प्रत होईल.
– प्रवेश शुल्क ऑनलाईन जमा करावे लागणार.
– मुख्याध्यापक व तंत्र सहाय्यक यांचे प्रशिक्षण, पालक व विद्यार्थ्यासाठी उद्बोधन वर्ग घेण्यात येतील,
त्याचे वेळापत्रक वेळोवेळी जाहीर केले जाईल.
– प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी होणार नाही.
अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नागपूर, अमरावती, नाशिक व औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत राबविण्यात येते. मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. त्यामुळे यंदा नव्याने मंजुरी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. महाविद्यालयीन जागा, अन्य माहिती भरावी असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे.
गेल्या 2019-20 शैक्षणिक वर्षामध्ये अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले होते. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशांचे लॉगिन आयडी व पासवर्ड 2019-20 मध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या माहितीतील आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर 1 जुलै 2020 पासून पाठवण्यात येतील. त्या लॉगिन, पासवर्डच्या सहाय्याने 2020-21 या वर्षाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीमध्ये काही बदल असल्यास तो अकरावी ऑनलाईनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करावा, अशी माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली.
शाळांना ऑनलाईन प्रशिक्षण
कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदा शाळा व महाविद्यालयांना विभागनिहाय ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठीची लिंकही विभागाने दिली आहे. ाशशीं. सेेसश्रश.लेा गुगल लिंकद्वारे
प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
दुसरा टप्पा विद्यार्थी नोंदणी…
महाविद्यालय नोंदणी झाल्यानंतर दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला टप्पा भरता येणार आहे. याचे वेळापत्रक नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी सरावाला कोरोनाचे सावट
कोरोनाचा फटका यंदा अकरावी प्रवेशप्रक्रियेवरही होणार आहे. यंदा अकरावी प्रवेशाचे तेरावे वर्ष आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रवेशातील होणारा गोंधळ कमी करण्यासाठी विद्यार्थी दहावीत असतानाच ऑनलाईन प्रवेशाची तयारी करून घेण्यात येते. दरवर्षी दहावीची परीक्षा संपली की तत्काळ प्रशिक्षण देण्यात येते. यंदा मात्र कोरोना असल्यामुळे विद्यार्थ्यांना सराव करताच आला नाही. दरवर्षी माध्यमिक शाळांत थेट ऑनलाईन प्रवेशाची माहिती पुस्तके आणि किट वितरीत करून विद्यार्थ्यांची पक्की तयारी करून घेण्यात येत होती. यंदा पुस्तके प्रिंटिंग होणार नाहीत तर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर डाउनलोड करून घेता येणार आहेत.
Ok