CBSE परीक्षा १ जुलै पासून होणार !
CBSE Exam From 1st July
सीबीएसईने 10वी आणि 12वीच्या राहिलेल्या विषयांच्या परीक्षांची तारीख घोषित केली आहे. या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलैदरम्यान पार पडतील. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. या परीक्षांच्या तारखेसंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत होते.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाउन सुरू आहे. यामुळे सीबीएसईच्या राहिलेल्या विषयांच्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या होत्या. यावेळी सीबीएसईने, परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात येतील, असेही सांगितले होते.
तत्पूर्वी, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता १० वी १२ वीच्या एकूण ज्या ४१ विषयांच्या परीक्षा ‘लॉकडाऊन’मुळे घेता आल्या नाहीत, त्यापैकी २९ महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षा शक्य तेवढ्या लवकर घेतल्या जातील व पेपर तपासून निकाल जाहीर करण्याचे कामही सुरू केले जाईल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले होते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यानंतर लॉकडाऊन वाढत असल्याने, राहिलेल्या विषयांच्या परीक्षा न घेताच उत्तीर्ण करावे, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होऊ लागली होती. मात्र, या पार्श्वभूमीवर माहिती देताना सूत्रांनी म्हटले होते, की ज्या विषयांच्या परीक्षा राहिल्या आहेत ते पुढील इयत्तेसाठी व पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संबंधित विषयाची तयारी पक्की व्हावी व विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता निकालात प्रतिबिंबित व्हावी यासाठी त्या विषयांची परीक्षा घेण्याचे टाळणे योग्य होणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेची नवी तारीख किमान तीन दिवस आधी कळविली जाईल.