यूपीएससी सीएपीएफ परीक्षेच्या अर्जप्रक्रियेला सुरुवात!!

UPSC CAPF Exam 2020

UPSC CAPF Exam 2020 : यूपीएससी सीएपीएफ २०२० परीक्षेच्या अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली आहे…

UPSC CAPF exam 2020: केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) आणि सशस्त्र सीमा दल (SSB) मध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) प्रक्रिया राबवणार आहे. २० डिसेंबर २०२० रोजी यासाठी लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार ७ सप्टेंबरपर्यंत आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर upsconline.nic.in आणि upsc.gov.in वर अर्ज करू शकतात.

किती पदांवर होणार भरती?

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यावर्षी CAPF मध्ये २०९ असिस्टंट कमांडंटची पदे भरती जाणार आहेत, यापैकी ७८ बीएसएफ मध्ये, १३ सीआरपीएफ, ६९ पदे सीआयएसएफ, २७ पदे आयटीबीपी तर २२ पदे एसएसबीमध्ये भरली जाणार आहेत.

आवश्यक पात्रता

पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. या परीक्षेसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार ७ सप्टेंबरपर्यंत upsconline.nic.in आणि upsc.gov.in या संकेतस्थळांवर जाऊन अर्ज करू शकतील. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना परीक्षा द्यायची नसेल तर यूपीएससी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचीही परवानगी देईल. परीक्षा न देणारे उमेदवार १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२० पर्यंत आपले अर्ज मागे घेऊ शकतील.

वयोमर्यादा

  • उमदेवाराचे किमान वय २० वर्षे तर कमाल वय २५ वर्षे हवे. आरक्षित प्रवर्गांना नियमांनुसार सवलत मिळेल.

कशी होणार निवड?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, फिजीकल एफिशिअन्सी टेस्ट, मेडिकल स्टँडर्ड टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे होईल. लेखी परीक्षेसाठी दोन पेपर असतील. लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.

सोर्स : म. टा.


UPSC CAPF Exam 2020 New Notification – परीक्षेची अधिसूचनाः केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नवे परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील भरती संबंधित आहे. यूपीएससीने या परिपत्रकात सीएपीएफ भरती परीक्षा २०२० च्या अधिसूचनेची माहिती दिली आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर हे परिपत्रक उपलब्ध आहे. या बातमीत पुढे त्याची लिंकही देण्यात येत आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार, CAPF (सहाय्यक कमांडंट्स) परीक्षा २०२० ची अधिसूचना बुधवारी, २२ एप्रिल २०२० रोजी यूपीएससी प्रकाशित करणार होते. त्याचबरोबर या नोकरभरतीची पूर्व परीक्षा ९ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात येणार होती. पण आता यूपीएससीच्या परिपत्रकानुसार, सीएपीएफच्या भरतीसंदर्भातील नोटिफिकेशन नंतर उपलब्ध केलं जाणार आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे आयोगाने कळवले आहे.

UPSC CAPF च्या कुठल्या सेवांमध्ये भरती? 

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स परीक्षेद्वारे विविध दलांमध्ये भरती केली जाते. सीएपीएफ असिस्टंट कमांडंट (Group A) द्वारे निवड झालेल्या उमेदवारांची पुढील दलांमध्ये नियुक्ती होते –

  • बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)
  • सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF)
  • सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF)
  • इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP)
  • सशस्त्र सीमा बल (SSB)

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. [email protected] says

    Tejal Shinde

  2. Pravin Pandit Ahire says

    Sir Agriculture Devlopment Officers vhayachay please suggest to me

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड