खुशखबर, अखेर राज्यभरातील ३४ जिल्ह्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पध्दतीने सुरक्षा रक्षक नेमण्यास मान्यता । Security Guard Bharti
Security Guard Bharti 2024
Suraksha Rakshak Bharti 2024
राज्यातील २९ जिल्हयामधील प्राथमिक आरोग्य केंद्रांकरीता कंत्राटी पध्दतीने बाहययंत्रणेव्दारे (आउट सोर्सिंग) सुरक्षा रक्षक सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली असून अनुक्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद रायगड, नाशिक, कोल्हापूर, जळगांव व नंदूरबार या ५ जिल्हयांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पध्दतीने बाहययंत्रणेद्वारे सुरक्षा रक्षक नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वरील शासन निर्णय हे प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पध्दतीने बाहययंत्रणेद्यारे सुरक्षा रक्षक नेमण्यास मान्यता देण्याबाबतचे आहेत. कंत्राटी पध्दतीने बाहययंत्रणेद्यारे सुरक्षा रक्षक नेमण्याच्या प्रक्रियेमध्ये एकसूत्रता राहावी यासाठी सर्व राज्यामध्ये एकाच स्तरावर निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. या साठी आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यभरातील ३४ जिल्हयांमध्ये १९०६ कार्यरत प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रति प्राथमिक आरोग्य केंद्र जास्तीत जास्त ३ सुरक्षा रक्षकांच्या सेवा बाहययंत्रणेव्दारे ३ वर्षाकरीता घेण्याकरीता सुरक्षारक्षकांचे प्रति महा ठोक वेतन रुपये १६०००/- प्रमाणे वार्षीक रुपये १०९.७८ कोटी अंदाजीत खर्चास दिनांक२५.०१.२०२४ च्या शासन निर्णय व दिनांक १२.०२.२०२४ शासन शुध्दीपत्रकमधील अटी व शर्तीच्या अधीन राहुन सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०७१११२१४४१५७१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
Download Suraksha Rakshak GR
Security Guard Bharti 2024
Security Guard Bharti 2024: The Department of Medical Education and Medicines has decided to recruit security guards on contract basis in 17 medical colleges and affiliated hospitals of the state from the perspective of security of resident doctors, teachers, nurses, officers, employees, patients and their relatives as well as hospital equipment etc. To get all the further updates regarding this recruitment on time, click here and download the official mobile app of Mahabharti in your mobile immediately.
Security Guard Bharti 2024: निवासी डॉक्टर, अध्यापक, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्याचबरोबर रुग्णालयातील यंत्रसामुग्री आदींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यातील १७ वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
१७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार ८३१ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील ‘परिशिष्ट अ’मध्ये नमूद १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयात प्रवेशित विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच संस्थेमधील प्राध्यापक / सह प्राध्यापक, कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार दोन सुरक्षा अधिकारी, एक सहाय्यक सुरक्षा रक्षक अधिकारी, दोन सुरक्षा निरीक्षक, १३ सुरक्षा पर्यवेक्षक आणि ८१३ सुरक्षा रक्षक अशी एकूण ८३१ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व सुरक्षा रक्षक महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित – पुणे, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ – मुंबई, रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळ, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळ यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक भरण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून सर्व भत्त्यांसह ३० कोटी ५४ लाख ९७ हजार ९१३ रुपये वार्षिक खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
Newasa Security Guard Bharti 2023
Security Guard Bharti 2023: Good News For those Who are Searching Suraksha Rakshak Bharti 2023 !! Shivswarajya Suraksha Pvt. at Nevasa Taluka Yoddha Career Academy, Nevasa (Saundla-Nagpur Shiwar) is going to hire 600 Security Guard Posts. Mega recruitment of security guards is being done from 3 May 2023 to 8 May 2023. Candidates can apply before last date and Know More details about Newasa Security Guard Bharti 2023 at below
नेवासा तालुक्यातील योद्धा करिअर अकॅडमी,नेवासा (सौंदळा-नागपूर शिवार) येथे शिवस्वराज्य सुरक्षा प्रा. लि. च्या मार्फत दि. ३ मे २०२३ ते ८ मे २०२३ रोजी सुरक्षा रक्षकांची मेगा भरती करण्यात येत असल्याची माहिती भरती अधिकारी शुभम पाटीदार यांनी दिली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शिवस्वराज्य सुरक्षा प्रा. लि. च्या मार्फत बेरोजगार तरुणांना स्थायी रोजगार देण्यासाठी थेट भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती योद्धा करिअर अकॅडमी नेवासा येथे दि.३ मे २०२३ ते ८ मे २०२३ रोजी केली जाणार आहे.
Physical Criteria For Security Guard Bharti 2023
सुरक्षा रक्षक आणि पर्यवेक्षक च्या ७०० जागा साठीच्या निवडी करिता शारीरिक निकष ऊंची १६५ सेंमी पेक्षा जास्त आहे, छाती ८० ते ८५ सेंमी, आणि वय दरम्यान असावे १८ ते ४० वर्षे, आणि वजन दरम्यान असावे ५० ते ९) किलो आणि १०वी शिक्षण ही पात्रता आहे.
निवडलेले उमेदवार मेट्रोस्टेशन, विमानतळ, पुरातत्व विभाग, बहुराष्ट्रीय कंपनी, राष्ट्रीयत्व बँक इत्यादींमध्ये पोस्ट केले जातील. निवडलेल्या २१ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर केवळ निवडक उमेदवारांना पीएफ, मेडिकल, फॅमिली मेडिकल, फॅमिली मोफत पीएफ, पेंशन, विधवा पेन्शन इ सुविधा मिळेल.
मासिक वेतन महाराष्ट्र गार्ड बोर्डच्या अनुसार १५ हजार ते १९ हजार रुपये ८ तास ड्यूटी आणि १९ हजार ते २२ हजार रुपये १२ तास ड्युटीचा पगार राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
भरती करिता भरती अधिकारी शुभम पाटीदार यांचेशी 7999885926 , 8888669598 या क्रमाकांवर संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.
Security Guard Bharti 2023
Security Guard Bharti 2023 : Wage hike has been implemented board wise. Nandatai Madhavrao Bhosale, general secretary of the Maharashtra State Security Guard and General Workers’ Union, went on a hunger strike in March to demand an increase in the salaries of security guards. Benefit to private security guards too – This decision will also make it possible to increase the salary of security guards in private security companies.
सुरक्षारक्षक मंडळातील नोंदीत रक्षकांच्या वेतन व भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील १२ मंडळांसाठी वेतनवाढ व लेव्हीच्या रकमेत वाढ जाहीर केली आहे. याचा ५० हजारापेक्षा जास्त सुरक्षारक्षकांना लाभ होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्रत्येक मंडळनिहाय वेतनवाढ लागू केली आहे. सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढीसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या सरचिटणीस नंदाताई माधवराव भोसले यांनी मार्चमध्ये उपोषण केले होते. खासगी सुरक्षारक्षकांनाही लाभ – या निर्णयामुळे खासगी सुरक्षारक्षक कंपन्यांमधील सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढ करणेही शक्य होईल. यामुळे खासगी सुरक्षा कंपन्यांमधील ७ ते ८ लाख सुरक्षारक्षकांच्या वेतनवाढीचा मार्गही सुकर होणार आहे.
Security Guard Bharti 2022 – Result
Security Guard Bharti 2022 : The Marks obtained in field examination, educational qualification and marks and other information has been available of Aggregate Bridge of Amravati District Security Guard Board-2021. Candidates submit their objections at the mentioned email address or address before the 10th of October 2022. Further details are as follows:-
Security Guard Board Recruitment 2022 – सुरक्षा रक्षक भरती निकाल
अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०२१ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, मैदानी परीक्षेस उपस्थित झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईल वरती मैदानी परीक्षेत मिळालेले गुण, शैक्षणिक अहर्ता व गुण व इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेद्वारांनी www.sgbregistration.in या संकेतस्थळावर जाऊन स्व:ताचे User ID आणि password टाकून प्रथम Login करावे , तद्नंतर My Account >> View Result वर click करून उमेदवारास पाठवलेले शाररीक व मैदानी परीक्षेत प्राप्त गुण, अर्जात नमूद केलेले शैक्षणिक अहर्ता, तपासून घ्यावे. त्यात उमेदवारास काही शंका/आक्षेप असल्यास [email protected] या इमेल आयडी वर, किंवा सचिव, अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, परांजपे कॉलनी, डॉ. पुंडकर प्लॉट, आर. टि. ओ. कार्यालय मागे, अमरावती – ४४४६०२ या पत्तावर दिनांक १०/१०/२०२२ पर्यंत पोहचतील असे पाठवावेत.
Security Guard Board Bharti 2022
त्यानंतर प्राप्त अर्जावर कोणती हि दखल घेतली जाणार नाही. सदर समुच्चय पुल तयार करणे हि थेट भरती नाही. त्यामुळे समुच्चय पुलासाठी पात्र उमेदवारांना नोकरीतील हमी देता येत नाही. मात्र ज्या प्रमाणात अस्थापानांकडून मागणी उपलब्ध होईल, त्यानुसार समुच्चय पुलावरील उमेदवारांना कामासाठी वितरीत केले जाईल. सदर समुच्चय पुल तयार करणेचे काम पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आले असून उमेदवारांनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती एजंट/दलाल यांच्याशी आर्थिक व्यवहार आणि संपर्क करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.
Security Guard Recruitment 2022
Security Guard Bharti 2022 : The deadline for online submission of the Character Verification Certificate and Health Test Certificate has been extended till 31st May, 2022 for the construction of Pune District Security Board’s Aggregate Bridge-2019. It should be noted that the certificate submitted thereafter will not be considered and no excuse will be considered after the expiry of the period. Further details are as follows:-
पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांना कळवण्यात येत आहे कि, आपले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि आरोग्य चाचणी प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करण्याची मुदत दिनांक ३१ मे २०२२ पर्यन्त वाढविण्यात आली आहे. त्यानंतर सादर केलेली प्रमाणपत्र ग्राह्य धरली जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच मुदत संपल्यावर कोणत्याही सबबीचा विचार केला जाणार नाही.
Security Guard Board Results (Cut Off Marks) Declared
Security Guard Bharti 2022: Following the advertisement of Pune District Security Guard Board for preparation of Aggregate Bridge-2019, reservation wise details (cut off) of the marks of eligible / eligible candidates have been published. Further details are as follows:-
पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ) प्रसिद्ध केला आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
मंडळाच्या समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ) पुढीलप्रमाणे.
उमेदवारांना सूचना :
१. उपरोक्त प्रमाणे समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांनी त्यांचा अर्जात केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने त्यांची पात्रता तपासण्याच्या आधीन राहून सुरक्षा रक्षक म्हणून मंडळात नोंदीत करून समुच्यय पुलावर घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
२. शारिरीक/ मैदानी परीक्षा प्राप्त गुण व शैक्षणिक गुण यांची बेरीज करून आलेल्या एकूण गुणांच्या आधारे, वरील प्रमाणे आरक्षण प्रवर्गानुसार कट ऑफ गुण जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवाराना सूचना करण्यात येते की ज्या उमेदवारांना त्यांच्या आरक्षण प्रवर्गा नुसार कट ऑफ गुणा एवढे वा जास्त गुण असतील त्यांना पुढील प्रक्रियेकरिता त्यांच्या नोंदीत भ्रमणध्वनी (Mobile) वर SMS पाठविण्यात येतील.
३. पात्र उमेदवारांना वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राचे नमूने यांच्या वैयक्तिक login नुसार https://sgbregistration.in या पोर्टलवर १ एप्रिल २०२२ रोजी उपलब्ध करून दिले जातील.
४. पात्र उमेदवारांनी स्वत:चे वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्र दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यन्त https://sgbregistration.in या पोर्टल वर जमा (upload) करावीत.
५. वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राच्या प्रत्यक्ष पडताळणीनंतर पात्र उमेदवारांनी B-Form साठी ऑनलाइन रु. १०० व इतर कर भरल्यानंतर मंडळाच्या प्रतीक्षा यादी वर सामील करून घेतले जाईल.
६. सदरचा निकाल म्हणजे कामाची हमी नसून विविध अस्थापना / फँक्टरी यांच्याकडून प्राप्त मागणीनुसार समुच्चय पूलातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना काम उपलब्ध करून देण्यात येईल.
७. पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, पुणे. सूमुच्चय पुल निकाल २०१९ हा मंडळाने शासनास दिंनाक १२-०२-२०२१ रोजीच्या पत्राद्वारे प्रवर्ग निहाय आरक्षणाबाबत मागितलेल्या मार्गदर्शनाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
Mumbai Mahanagarpalika Security Guard Vacancy 2022
Security Guard Bharti 2022 : A decision will be taken soon to fill 1800 vacancies of security guards in Mumbai Municipal Corporation. These vacancies put a strain on the existing security guards. Sometimes they have to do double duty. Further details are as follows:-
मुंबई महापालिकेतील सुरक्षारक्षकांची 1800 रिक्त पदे (Security Guard Bharti 2022) भरण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये जलाशये, रुग्णालय, उद्यान, स्मशानभूमी अशा ठिकाणी सुरक्षारक्षकांची 1800 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांवर कामाचा ताण असतो. काही वेळा त्यांना डबल डय़ुटी करावी लागते. सुरक्षारक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे पालिकेच्या उद्यान, मैदानात चोऱ्या आणि गर्दुल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षारक्षकांची ही पदे भरावीत यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार वरळी युवासेनेचे उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिक्त पदांचा आढावा घेऊन लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली. बैठकीला उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, उपआयुक्त प्रभात रहांगदळे, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे आदी उपस्थित होते.
सध्या कोरोना मुले मुंबई महापालिकेत अत्यावश्यक सेवेच्या विविध विभागांत भरती केली जात आहे. मात्र १४०० पदे रिक्त असलेल्या सुरक्षा विभागात भरती का केली जात नाही, असा सवाल कामगार संघटनांनी केला आहे.
सध्या सुरु असलेल्या करोनाच्या साथीत अधिक मनुष्यबळाची गरज असल्याने प्रशासनाने अग्निशमन दल जवान व सुरक्षा रक्षकांना तीन पाळ्यांमध्ये ड्युटी लावली आहे. त्यामुळे असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कामाचा ताण येत आहे. नेमणुकीच्या जागा अनेक आणि रक्षकांची संख्या कमी असल्याने असंख्य महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाविनाच गाडा हाकला जात आहे.
सध्या पालिकेत सुरक्षा रक्षकांची ३८०० मंजूर पदे असून त्यातील १४०० म्हणजे ३७ टक्के पदे रिक्त आहेत. मध्यंतरी सुरक्षा रक्षकांची काही पदे भरण्यात आली. त्या भरतीच्या प्रतीक्षा यादीवरील जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिकेकडे केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्णालये व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असून त्यासाठी तातडीने या विभागात भरती करावी, असे बने यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत यांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे. हि बातमी सविस्तर महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित झालेली आहे.
Table of Contents
Amaravati chi mirit list kevha lagnar aahe sir.
Amravati chi suraksha rakshak mirit list kevha lagnar aahe sir.