विदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांची ७१ टक्के पदे रिक्त
71% Vacant Post for Doctors
विदर्भात करोना आणि सारी (सीव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन) या दोन्ही आजारांचे रुग्ण वाढत असतानाच वर्ग एक संवर्गातील तज्ज्ञांची जवळपास ७१ टक्के पदे रिक्त आहेत. या मध्ये वर्ग दोनमध्येही १८ टक्के पदे रिक्त असल्याने या दोन्ही आजारांसह इतर रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे. या संर्दभातील बातमी लोकसत्ता मध्ये १४ एप्रिल २०२० रोजी प्रकाशित झालेली आहे. खाली आपण पूर्ण बातमी वाचू शकता.
रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने डॉक्टरांवर कामाचा ताण वाढत असतानाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवाचाही परिणाम रुग्ण सेवेवर होत आहे. आरोग्य विभागाकडून मात्र शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार उत्तम उपचार दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. रिक्त पदांच्या संख्येला दोन्ही आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच.