वसईत तहसील मध्ये ७५ पदे रिक्त! नवीन पदभरती प्रक्रिया..! – Vasai Tahsil Office Vacancies

Vasai Tahsil Office Vacancies

Vasai Tahsil Office Vacancies  सध्या वसई तहसील ऑफिसमध्ये सरकारी कर्मचारीच नाहीत म्हणावं इतकी बिकट अवस्था झालीय! सध्या १४४ पदांपैकी फक्त ६९ लोकच नोकरीवर आहेत, उरलेली ७५ पदं रिकामी आहेत. एवढ्या मोठ्या रिक्त जागांमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामं वेळेवर होत नाहीत आणि त्यामुळेच दलालांचं फावतंय. या मुळे नागरिकांची अनेक काम खोळंबली आहे. या रिक्त पदांमुळे अनेकाना त्रास होत आहे. तेव्हा नवीन पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यता यावी अशी मागणी जोर धरत आहे. 

Staff Crunch in Vasai!

तहसीलदारांनी रिक्त पदांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली पण अजूनही काहीच हालचाल नाही. त्यामुळे आता नागरिकांच्या कामासाठी ऑफिसात आले की त्यांना चकरा माराव्या लागतात आणि कामं लांबट चालतात. सध्या ऑफिसात जवळपास ६०-७० खाजगी लोक काम करतायत. पण त्यांना पगार कोण देतं? हेच कुणाला माहिती नाही – म्हणजे बिनधास्त प्रकरण!नायब तहसीलदाराच्या ४ पदांपैकी २ अजून भरायची आहेत. महसूल सहाय्यकाच्या १९ जागांपैकी ९ अजून रिकाम्या. तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, वाहनचालक, वरिष्ठ कारकून – या सगळ्या पदांची वर्षानुवर्षे भरतीच नाही!

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यामुळे सगळा ताण सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर येतोय. कामं वेळेत होत नाहीत, कागदपत्रं हरवतात, टपाल महिन्यन्‌महिने पडून असतो, केसचं ऐकणं होत नाही – आणि सगळ्याची चिडचिड नागरिकांना सहन करावी लागते. आता अधिकारी म्हणतात, “दोन कर्मचारी असले तरी सेवा देऊ!” पण प्रश्न असा की दर्जा कसा राहणार? आणि वेळेत कामं होणार का?


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड