टीम इंडियात सोबत सरळ नोकरी करण्याची सुवर्णसंधी संधी!-Job Opportunity with Team India!

Job Opportunity with Team India!

मित्रानो क्रिकेट बद्दल क्रेझ भारतात जवळपास सर्वानाच आहे. त्यातच सर भारतीय क्रिकेट टीम सोबत फिरण्याची आणि नोकरीची संधी मिळाली तर? हे तर एकदम मस्तच होईल! तर मित्रांनो, खरंच आता टीम इंडियासोबत काम करण्याची सुवर्णसंधी चालून आली असून भारतीय क्रिकेट प्रेमींना आपल्या कारकिर्दीत एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याची संधी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने महिला क्रिकेट संघासाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे – हेड फिजिओथेरपिस्ट आणि स्ट्रेंथ अ‍ॅण्ड कंडिशनिंग कोच या पदांसाठी हि भरती सुरु झाली आहे.

Job Opportunity with Team India!

 

हेड फिजिओथेरपिस्ट पदासाठी इच्छुक उमेदवारांकडे किमान १० वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच, त्यांनी फिजिओथेरपीत स्पोर्ट्स, मस्क्युलोस्केलेटल, एक्सरसाईज मेडिसिन किंवा स्पोर्ट्स रिहॅबिलिटेशन यासारख्या शाखांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी. हे पद केवळ उपचार पुरवण्यासाठी नसून, खेळाडूंना दुखापतीतून लवकर बरे होण्यासाठी, त्यांच्या शरीरसामर्थ्याची काळजी घेण्यासाठी आणि पुनर्वसन प्रक्रियेची योजना आखण्यासाठी अत्यंत जबाबदारीचं असतं. त्याचबरोबर, उमेदवाराने याआधी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघ किंवा खेळाडूंसोबत प्रत्यक्षात काम केलेलं असणंही आवश्यक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दुसरीकडे, स्ट्रेंथ अ‍ॅण्ड कंडिशनिंग कोच पदासाठी किमान ७ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असावा लागतो. हा कोच संघातील प्रत्येक खेळाडूच्या फिटनेसवर काम करतो. त्यांच्या दैनंदिन वॉर्मअप, ट्रेनिंग सेशन्स, आणि स्पर्धात्मक सरावाचं नियोजन करणं ही या पदाची मुख्य जबाबदारी आहे. याशिवाय, खेळाडूंना सामन्यांमध्ये जास्तीत जास्त परफॉर्म करता यावं, यासाठी त्यांची ताकद, सहनशक्ती आणि लवचिकता वाढवणारे खास ट्रेनिंग प्रोग्रॅम्स तयार करणं गरजेचं आहे.

ही दोन्ही पदं केवळ नोकरीची संधी नाहीत, तर भारताच्या क्रिकेट विश्वात प्रत्यक्ष सहभागाची आणि योगदान देण्याची अविस्मरणीय संधी आहे. योग्य पात्रता आणि अनुभव असलेल्यांनी ही संधी नक्कीच दवडू नये. अर्जाची माहिती लवकरच BCCI च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड