अमरावती जिल्ह्यत अंगणवाडी भरती रखडली, पुढील टप्पा आता….! – Anganwadi Recruitment On Hold!

Anganwadi Recruitment On Hold

अमरावती  जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रिया सध्या अडथळ्यांमुळे थोडी रखडली आहे. भरती प्रक्रियेनंतर काही उमेदवारांची निवड करण्यात आली खरी, पण काही निवड न झालेल्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेत अनियमितता असल्याचे म्हणत आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Anganwadi Recruitment Stalled!

या भरती प्रक्रियेत एकूण २५२ सेविका व मदतनीसांची निवड झाली होती. मात्र त्यापैकी २२ अंगणवाडी सेविका आणि २३ मदतनीस, अशा ४५ पदांवर आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवारांना सध्या नियुक्तीपत्र देणे थांबवण्यात आले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तरीदेखील ज्या पदांवर कुठलाही आक्षेप नाही, अशा ९२ अंगणवाडी सेविका आणि १६० मदतनीसांना नियुक्तीपत्र देऊन कामावर रुजू होण्याचे आदेश दिले गेले आहेत.

सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात एकूण २,५९२ अंगणवाडी केंद्रं आहेत. त्यामध्ये २,४७८ सेविका आणि २,४०९ मदतनीस कार्यरत आहेत. तरीदेखील ११४ सेविका आणि १८३ मदतनीसांची पदं अजूनही रिक्त आहेत.

ज्या पदांवर आक्षेप आले आहेत, त्याची चौकशी लवकरच प्रकल्पस्तरावर सुरू होणार असून, दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर उर्वरित निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड