महत्वाचे !! पवित्र पोर्टल द्वारे आता शिक्षक पदांची भरती ही रिक्त पदांची शहानिशा करूनच होणार !-Vacancy Verification Must!

Vacancy Verification Must!

शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्राथमिक व माध्यमिक संचालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करूनच उर्वरित खरे रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रकाशित व्हाव्यात. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यास, व शिक्षक पदे कमी असल्यास, जाहिरात आणि प्रत्यक्ष रिक्त पदांची खातरजमा तात्काळ करावी.

Vacancy Verification Must!

आयुक्त सिंह यांच्या म्हणण्यानुसार, 2024-25 च्या संचमान्यतेप्रमाणे मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांचा विचार करूनच भरतीची प्रक्रिया राबवावी. जर पद मंजूर नसेल तर उमेदवारांना नेमले जाऊ शकत नाही, हे लक्षात घेऊनच पोर्टलवर जाहिराती टाकाव्यात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सर्व शाळांमध्ये भरती करताना सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड बुद्धिमत्ता चाचणी 2022 च्या गुणांवर आधारित केली जात आहे.

आत्तापर्यंत 15,063 पदे मुलाखतीशिवाय आणि 2,771 पदे मुलाखतीसह असे एकूण 18,034 शिक्षक पदांसाठी शिफारसी झाल्या आहेत. आता 20 जानेवारी 2025 पासून दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी नव्या जाहिरातींची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

2024-25 मध्ये संचमान्यता बदलल्याने काही व्यवस्थापनांकडे पदे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व जाहिराती आणि रिक्त पदांची शहानिशा करूनच पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड