महापालिकेत मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांची भरती : वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवा क्षेत्राला दिलासा! | BMC Doctor Recruitment Soon!
BMC Doctor Recruitment Soon!
मुबई म्हणजे एकदम घनदाट लोकसंख्येचे शहर. त्यात रोज लाखो लोकांना डॉक्टरांची गरज पडते. मुंबईतील केईएम, सायन, नायर आणि कूपर यांसारखी महापालिकेच्या अधिपत्याखालील नामांकित वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये ही शहरातील आरोग्यसेवेचा कणा मानली जातात. मात्र, गेल्या काही काळात या संस्थांमध्ये डॉक्टरांच्या पदांची मोठ्या प्रमाणावर रिक्तता निर्माण झाली आहे. यामुळे रुग्णसेवेवर आणि वैद्यकीय शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून, सध्याच्या कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. यामुळे नवीन भरती प्रक्रिया होणे अत्यावश्यक होते!
ही स्थिती लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ७०० हून अधिक डॉक्टरांच्या पदांची भरती करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. या भरतीमध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांसारख्या पूर्णवेळ पदांचा समावेश असून, यामुळे शैक्षणिक व वैद्यकीय सेवांचा दर्जा मोठ्या प्रमाणात सुधारेल अशी अपेक्षा आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण ८९१ सहाय्यक प्राध्यापक पदे आहेत, परंतु यामध्ये तब्बल ४३९ पदे सध्या रिक्त आहेत. ही पदे दीर्घकाळापासून भरली गेली नसल्याने अनेकजण कंत्राटी तत्वावर काम करत आहेत. काही प्राध्यापक सात-आठ वर्षांपासून करारावरच सेवा देत असून, त्यांना शाश्वतीचा अभाव आहे.
या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे अध्यापन, रुग्णसेवा आणि प्रशासकीय कामकाज या तिन्ही बाबींवर विपरीत परिणाम होत आहे. अध्यापक संख्या अपुरी असल्यामुळे वर्गाचे वेळापत्रक व्यत्ययास येत आहे आणि रुग्णसेवेचा वेग व दर्जा दोन्ही कमी झाला आहे. तसंच प्रशासनावरही अतिरिक्त भार येत आहे.
या भरती प्रक्रियेवर काही काळासाठी आरक्षणातील बदलांमुळे अडथळा निर्माण झाला होता. मात्र, आता महापालिका आयुक्तांनी यास मंजुरी दिली असून, सर्व संबंधित फायली नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत. लवकरच अंतिम परवानगी मिळून भरती प्रक्रिया अधिकृतरीत्या सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रस्तावित भरतीमुळे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्थिरता निर्माण होईल. नवीन भरतीमुळे शिक्षणात सातत्य, प्राध्यापकांची उपलब्धता आणि संशोधनाची गुणवत्ता वाढण्यास हातभार लागेल. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि शिक्षणाची गुणवत्ता टिकवली जाईल.
डॉक्टरांची भरती झाल्यानंतर रुग्णालयांतील सेवा जलद व दर्जेदार होईल. रुग्णांना वेळेत उपचार मिळतील आणि प्रत्येक विभागात आवश्यकतेनुसार डॉक्टरांची उपस्थिती राहील. त्यामुळे सामान्य जनतेला याचा थेट फायदा होणार आहे.
या महत्त्वाच्या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयांच्या संचालिका डॉ. नीलम आंद्राडे यांनी भरतीच्या निर्णयाचे स्वागत केले असून, वैद्यकीय शिक्षण व सेवा या दोन्ही अंगांनी याचा सकारात्मक परिणाम होईल, असे मत व्यक्त केले आहे. ही भरती म्हणजे मुंबईतील आरोग्य यंत्रणेला मिळणारा नवसंजीवनी ठरणार आहे.