SWAYAM 2025 परीक्षेसाठी अर्ज सुरू! -SWAYAM 2025 Registration Open!
SWAYAM 2025 Registration Open!
केली
सरकारच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून SWAYAM 2025 परीक्षेची नोंदणी सुरू झाली हाय. ‘SWAYAM’ म्हणजेच स्टडी वेब ऑफ अॅक्टिव लर्निंग फॉर यंग एस्पायरींग माइंड्स – एक सरकारी मोफत ऑनलाइन शिक्षण योजना. जो कोणी या कोर्समधून काहीतरी शिकायचं म्हणतो, त्याच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२५ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
परीक्षा कधी आणि कशी होईल?
ही SWAYAM परीक्षा १७, १८, २४ आणि २५ मे २०२५ रोजी होणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन (CBT) आणि काही कोर्सेससाठी लिखित पद्धतीने घेतली जाईल. एकूण ५०४ कोर्सेससाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर सरकारी प्रमाणपत्र मिळतं, जे पुढच्या शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी उपयोगी पडतं.
अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम swayam.nta.ac.in या वेबसाईटवर जायचं. तिथं “SWAYAM 2025 Registration” लिंकवर क्लिक करायचं. नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून नोंदणी करायची. नंतर फोटो, सही आणि जात/अपंग प्रमाणपत्र (असल्यास) अपलोड करायचं. नंतर फी भरून अर्ज सबमिट करायचा.
फी किती लागते?
जर तुम्ही जनरल कॅटेगरीत असाल तर पहिल्या कोर्ससाठी 750 आणि प्रत्येक पुढच्या कोर्ससाठी 600 लागतील.
OBC, SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी पहिल्या कोर्सची फी 500, आणि प्रत्येक अतिरिक्त कोर्ससाठी 400 ठेवण्यात आलीय. त्यामुळे कमी खर्चात अनेक कोर्स करता येतात.
लक्षात ठेवण्यासारखं काय?
जे विद्यार्थी अर्जात काही चूक करतील, त्यांना २३ ते २५ एप्रिल या कालावधीत सुधारणा करण्याची संधी मिळेल. पण एकदा ही वेळ गेल्यावर सुधारणा करता येणार नाहीत. म्हणून फॉर्म भरताना नीट लक्ष द्या. आणि वेळेत अर्ज करा, नाहीतर ही संधी हुकू शकते!