https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

ग्रामीण रुग्णालयांत भरपूर पदे रिक्त, नवीन पदभरती प्रक्रिया आता लवकरच! – 50% Doctor Posts Vacant !

50% Doctor Posts Vacant !

सध्या ग्रामी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे. त्या मुले पुढे होणाऱ्या आरोग्य विभाग भरती मध्ये हि पदे भरली जन आहेत. या मुले या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. परंतु सध्या तरी, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त पदं रिक्त पडली आहेत. एकूण मंजूर १२३ पदांपैकी फक्त ६१ पदं नियमित भरलेली असून उर्वरित पदं रिकामं आहेत. सध्या ३१ कंत्राटी डॉक्टरांच्या भरवशावर रुग्णसेवा सुरू आहे. त्यामुळे मोठ्या अपघातात जखमी झालेले रुग्ण असोत की गंभीर आजाराने त्रस्त असलेले, त्यांना चंद्रपूरला रेफर करावं लागतं.

50% Doctor Posts Vacant !

चार मोठी उपजिल्हा रुग्णालयं वगळता इतर ग्रामीण भागात डॉक्टर नाहीतच!
चिमूर, वरोरा, राजुरा आणि ब्रम्हपुरी ही चार शंभर खाटांची उपजिल्हा रुग्णालयं वगळता, उर्वरित ग्रामीण रुग्णालयांत डॉक्टरांची संख्या अत्यल्प आहे. नागभीड, सिंदेवाही आणि सावलीसारख्या ठिकाणी तर कंत्राटी डॉक्टरांच्या भरवशावरच आरोग्यसेवा सुरू आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

१२३ मंजूर पदं, पण ६२ पदं रिक्त!

जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये ग्रामीण रुग्णालयं कार्यरत आहेत. पण सरकारने मंजूर केलेल्या १२३ डॉक्टरांच्या पदांपैकी फक्त ६१ पदं भरली गेली आहेत, तर तब्बल ६२ पदं अद्याप रिक्तच आहेत. औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ही परिस्थिती चिंताजनक आहे.

  • चिमूर: १२ मंजूर पदं – सर्व भरलेली
  • वरोरा: १२ मंजूर पदं – ११ भरलेली
  • राजुरा: ६ मंजूर पदं – सर्व भरलेली
  • ब्रम्हपुरी: सर्व पदं भरलेली
  • नागभीड व सिंदेवाही: फक्त कंत्राटी डॉक्टरांवर अवलंबून
  • गोंडपिंपरी: ३ मंजूर पदांपैकी फक्त १ कंत्राटी डॉक्टर उपलब्ध
  • बल्लारपूर: ३ मंजूर पदांपैकी फक्त १ कायम डॉक्टर, उर्वरित २ कंत्राटी
  • कोरपना, पोंभूर्णा, जिवती: येथे कोणताही कायमस्वरूपी डॉक्टर नाही!

पती-पत्नी डॉक्टरांचा बदली वाद आणि राजकीय हस्तक्षेप

मूल येथे पती-पत्नी वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते, मात्र पतीची बदली झाल्यानंतर पत्नीचीही बदली झाली. पण तिला अद्याप नवीन ठिकाणी रुजू होऊ दिलं जात नाही, अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे स्वत: पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून डॉक्टरला मोकळं करण्याची मागणी केली आहे, अशीही चर्चा आरोग्य क्षेत्रात आहे.

कंत्राटी डॉक्टरांच्या भरोशावर आरोग्यसेवा

गडचांदूर येथे ३ मंजूर पदं आहेत, पण तिथेही फक्त कंत्राटी डॉक्टरांवरच काम सुरू आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा दिवसेंदिवस ढासळत आहे, पण पदं भरली जात नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांना अजूनही मोठ्या शहरात हलवावं लागतं, ही मोठी शोकांतिका आहे.

ग्रामीण भागात आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार? हा मोठा प्रश्न आहे!

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड