नागपुरात आर्मी स्कूलमध्ये नोकरीची मुलाखतीद्वारे सरळ संधी! – Job Opportunity at Army School in Nagpur!
Job Opportunity at Army School in Nagpur!
आर्मी स्कूलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. परीक्षांपासून मुलाखतींपर्यंतची प्रक्रिया पार केली तरीही काही वेळा संधी हुकते. पण जर तुम्ही अजूनही आर्मी स्कूलमध्ये नोकरीच्या शोधात असाल, तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे!
नागपुरातील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्य शिक्षिका, PGT, TGT, PRT, शारीरिक शिक्षण, कला-हस्तकला, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, समुपदेशक, विशेष शिक्षक, IT पर्यवेक्षक प्रभारी, प्री-PRT, लॅब अटेंडंट अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एकूण २३ रिक्त पदांवर भरती होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२५ आहे.
यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आर्मी पब्लिक स्कूल, कामठी, द मॉल रोड, कामठी कँट, नागपूर-जबलपूर रोड, पिन-४४१००१ या पत्त्यावर अर्ज पाठवावा. निवड झालेल्या उमेदवारांना नागपुरात नोकरी करावी लागेल, तसेच चांगल्या वेतनाचा लाभ मिळेल.
भरती प्रक्रियेची अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे:
www.apskamptee.in