माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थींची पडताळणी अंतिम टप्प्यात!-Beneficiary verification in final stage!
Beneficiary verification in final stage!
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सध्या निकषांनुसार काटेकोर पडताळणी सुरू आहे. यापूर्वी लाभार्थींच्या नावावर चारचाकी वाहने असल्यास त्यांची पडताळणी करण्यात आली होती. आता, ज्या लाभार्थी बहिणींच्या नावामध्ये बदल, त्रुटी किंवा अन्य चुका आहेत, त्यांचीही तपासणी केली जात आहे. यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी भेट देऊन लाभार्थ्यांच्या नावाची आणि ओळखीची खातरजमा करत आहेत.
पडताळणीमुळे लाभ मिळण्यात होणार विलंब
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सध्या राज्य सरकारकडे या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही. यामुळे लाभ मिळण्याच्या प्रक्रियेत विलंब होत आहे. शासन निर्णयानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना दरमहा ₹1500 प्रमाणे मदत दिली जाते. मात्र, सध्या निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा लाभ मिळणार नाही. अधिकारी सांगतात की ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थींच्या खात्यात दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी ₹3000 जमा करण्यात येतील.
निधीअभावी इतर योजनांचाही लाभ रखडला
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात जाहीर करण्यात आलेल्या काही योजनांसाठीही निधीची कमतरता जाणवत आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना आणि लेक लाडकी योजना यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने अनेक लाभार्थी सध्या प्रतीक्षेत आहेत.
पडताळणी अंतिम टप्प्यात
सध्या योजनेच्या निकषांनुसार लाभार्थ्यांची अंतिम पडताळणी सुरू आहे. यात चारचाकी वाहनधारक महिलांसोबतच नावात त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांचीही पडताळणी केली जात आहे. या तपासणी प्रक्रियेसाठी शासनाकडून विविध याद्या पाठवण्यात आल्या असून त्यानुसार योग्य लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. शासन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाभ मिळण्यास सुरुवात होईल, मात्र त्यासाठी नेमकी तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.