https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लवकरच ३ हजार पशुवैद्यकांची भरती!! – 3,000 Veterinary Positions to be Filled Soon in Government Veterinary Colleges!!

3,000 Veterinary Positions to be Filled Soon in Government Veterinary Colleges!!

राज्यातील पशुधनाची संख्या ३ कोटी ३० लाखांवर पोहोचली असताना, पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशीनुसार दर ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक आहे(Veterinary Positions Filled in Government Veterinary Colleges) . या पार्श्वभूमीवर शासनाने मोठा निर्णय घेत राज्यातील पशुवैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी ३,००० पशुवैद्यकांची भरती लवकरच होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली.

3,000 Veterinary Positions to be Filled Soon in Government Veterinary Colleges!!

अकोला, सांगली, बारामती आणि परभणी येथे नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालये मंजूर करण्यात आली आहेत. या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुल्कवाढ होणार नाही. तसेच खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांसाठीही शुल्क नियमन प्राधिकरणामार्फत शुल्क निश्चित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे, खासगी महाविद्यालयांना परवानगी देताना शासनाने कठोर निकष लागू केल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्यातील पशुवैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी सरकारने श्रेणी-१ पशू रुग्णालयांमध्ये पदवीधारक पशुवैद्यक असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ३,००० हून अधिक पशुवैद्यकांची आवश्यकता भासणार आहे. पशुवैद्यकीय परिषद अधिनियमाच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे पशुधनासाठी अधिक चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होतील.

शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थितीबाबत विधानपरिषद सदस्य अरूण लाड यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी एकनाथ खडसे, सदाभाऊ खोत आणि अभिजित वंजारी यांनीही उपप्रश्न विचारले. राज्यातील पशुवैद्यकीय शिक्षण आणि पशुसंवर्धन व्यवस्थेतील सुधारणा करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड