लाडकी बहीण योजनेचं नवीन अपडेट- तक्रारी आलेले अर्ज नव्या निकषानुसार बाद ठरणार!
Ladki Bahin Application verification
Ladki Bahin Application verification – अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र असतील. मात्र, ज्यांच्या अर्जाबाबत तक्रारी येतील त्यांच्याच अर्जाची पडताळणी होईल आणि त्यात तथ्य आढळल्यास त्या योजनेसाठी अपात्र ठरतील, असे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करून त्यातील महिलांची संख्या कमी केली जाणार असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यात तथ्य नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अर्जाची पडताळणी निकष
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न
- घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन
- शासकीय नोकरी असताना घेतलेला योजनेचा लाभ
- इतर शासकीय योजनांचा लाभ
- विवाहानंतर परराज्यात गेलेल्या लाभार्थी
अर्जाची पडताळणी केली जाणार नाही अथवा योजनेचे नियमही बदलले जाणार नाहीत, तक्रारी येतील अशा अर्जाची पडताळणी होईल, असे तटकरे म्हणाल्या. सध्या अर्जाची सरसकट छाननी करणार नाही. केवळ स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दिलेल्या अर्जाचीच पडताळणी केली जाईल. गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, हा या मागील हेतू असल्याचे त्या म्हणाल्या. आपण विनातक्रार पडताळणी करणार नाही. मात्र, अडीच लाखांच्या पुढे उत्पन्न गेले असेल, तर ती महिला योजनेसाठी पात्र राहणार नाही. या योजनेच्या हप्त्याची रक्कम २,१०० रुपये करण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाईल, असेही तटकरे यांनी सांगितले.