कचरा रीसायकलिंगमधून मिळणार ११ लाख नोकऱ्या; सध्या या क्षेत्रातून १.२५ लाख लोकांना रोजगार मिळत आहे | Waste Management Job Vacancy

Waste Recycling Job Vacancy

Waste Management Job Vacancy: देशात दररोज मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे उत्पादन होत आहे. शहरांमधून दररोज सुमारे तीन लाख टन कचरा निर्माण होतो. त्यातील केवळ २० टक्के कचऱ्याचेच पुनर्वापर (रिसायकलिंग) करता येते. सध्या कचरा रिसायकलिंग उद्योगाचा वार्षिक महसूल ६० हजार कोटी रुपये आहे. २०३० पर्यंत हा महसूल तीन लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सध्या या क्षेत्रातून १.२५ लाख लोकांना रोजगार मिळत आहे. येत्या सहा वर्षांत या उद्योगामुळे ११ लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

रिसायकलिंग उद्योगाशी संबंधित रिसस्टेनिबिलिटी लिमिटेड या कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मसूद मलिक यांनी सांगितले की, देशातील कचऱ्याच्या मोठ्या प्रमाणामुळे रिसायकलिंग उद्योगासाठी भविष्यात विस्तार आणि गुंतवणुकीसाठी खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कामगारांचे आरोग्य जपण्याचे मोठे आव्हान

■ कचरा व्यवस्थापन उद्योग वेगाने विकसित होत आहे. यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाढत्या धोकादायक कचऱ्यामुळे मोठे आव्हान सध्या मानवजातीमसोर उभे राहिले आहे.

■ कचऱ्याची विल्हेवाट लावताना यात काम करणाऱ्यांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकाराचा धोका निर्माण होऊ नये यासाठीही काळजी घ्यावी लागणार आहे

■ कचरा जमा करणे, त्याची शास्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे, प्रक्रिया करण्यायोग्य कचऱ्याचे विलगी- करण करणे याचे योग्य प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार आहे.

सरकारने राबवलेल्या स्वच्छता अभियानामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत कमालीची जागरूकता वाढली आहे. त्यांच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. बदललेल्या या मानसिकतेचा लाभ देशातील रीसायकलिंग उद्योगाला मोठ्या प्रमाणात झाला आहे


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड