खुशखबर- लाडक्या बहिणींना मिळणार सरकार कडून संक्रांतीची मोठी भेट!
ladki bahin sankranti bhet
मुख्यमंत्री माझी लाहकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पावणेअकरा लाख तर राज्यभरातील दोन कोटी ६९ लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देण्यात आला असून आता डिसेंबरचा ताभ राहिलेला आहे. पुढे १४ जानेवारीला मकर संक्रांत असल्याने लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा लाभ एकत्रितपणे (८,१०० कोटी) देण्याचे नियोजन राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने केले आहे. हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये महिला व बालविकास विभागासाठी दोन हजार १५५ कोटींची तरतूद करण्यात आती आहे. आता नव्या मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत दोन महिन्यांच्या निधीला मान्यता अपेक्षित आहे.
तात्पूर्वी, राज्य सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळविली आहे. विधानसभेपूर्वी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आठवडयाता साधारणतः तीन ते साडेतीन हजार कोटींचे कर्ज घेण्यात आहे. पण, आता कर्जाची मर्यादादेखील संपत आत्याने त्या रकमेचे नियोजन काटेकोरपणे केले जात आहे. निवडणुकीनंतर आमदारांना देखील विकासकामांचा निधी मिळालेला नाही. जिल्हा नियोजन समित्यांचाही निधी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा लाभ एकत्रित देऊन पुढे अर्थसंकल्पी अधिवेशनापूर्वी दोन महिन्यांचा लाम दिला जाईल, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मार्वनंतर शक्य झाल्यास लाडक्या बहिणींना १ एप्रिलपासून प्रत्येकी २,१०० रुपये दिले जावू शकतात, असेही सांगण्यात आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुख्यमंत्री माझी लाहकी बहीण योजनेसाठी १५ ऑक्टोवरच्या मुदतीपर्यंत पावणेतीन कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. पण, त्यात संजय गांधी निराधार योजनेतील देखील लाभार्थी महिला आहेत. याशिवाय कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाखांहून अधिक असलेल्या व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलादेखील अर्जदार आहेत. दरम्यान, शासनाच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकाच योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे अर्जाची पडताळणी निश्चितपणे होणार आहे, पण तुर्तास त्यासंबंधीचा शासन निर्णय झाला नाही.