‘टीईटी’साठी ऑनलाइन २१ हजार अर्ज, ५५ परीक्षा केंद्रांवर १० ला परीक्षा; १२० पोलिसांचा बंदोबस्त | Maha TET Admit Card Download

Maha TET Hall Ticket 2024

Maha TET Admit Card Download: दोन वर्षांपासून रखडलेल्या ‘टीईटी’ परीक्षेला (शिक्षक पात्रता परीक्षा) अखेर मुहूर्त लागला असून, राज्यभरात १० नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्हयातील सुमारे २१ हजार ८७ भावी शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. त्यासाठी जिल्ह्यात ५५ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. येते जाणून घ्या महा टेट परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

५५ परीक्षा केंद्रांवर १० ला परीक्षा; १२० पोलिसांचा बंदोबस्त

२०१३ पासून टीईटी परीक्षा सुरू करण्यात आल्या. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे आणि ‘टीईटी’ च्या बोगस प्रमाणपत्रांमुळे दोन ते तीन वर्षांपासून ही परीक्षा रखडली होती. यामुळे परीक्षेबाबत भावी शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र ही रखडलेली परीक्षा आता नोव्हेंबरमध्ये होत आहे. राज्यात एकाच वेळी नोव्हेंबरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. पेपर क्रमांक १ (पहिली ते पाचवी), पेपर क्रमांक २ (सहावी ते आठवी) होणार आहे. पेपर क्रमांक १ हा १० नोव्हेंबरला सकाळी साडेदहा ते दुपारी एक आणि पेपर क्रमांक २ हा दुपारी दोन ते साडेचार यावेळेत होणार आहे. परीक्षेसाठी झावश्यक असलेली सर्व तयारी ही शिक्षण विभागाने केली असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छीक यांनी सांगितले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Maha TET Exam Date

Maha TET Exam Date

परीक्षेचे नियोजन असे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबरला होणार आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ५५ केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाणार आहे. यात पेपर क्रमांक १ साठी २१ तर, पेपर क्रमांक २ साठी ३४ केंद्रे व आठ झोन आहेत. पेपर क्रमाक एक ८ हजार ६६४, तर पेपर क्रमांक २ साठी १२ हजार ४२३ परीक्षार्थी प्रविष्ट आहेत. परीक्षेसाठी आठ व एक राखीव असे नऊ झोनल अधिकारी, ५९ सहाय्यक परिरक्षक, ५९ केंद्र संचालक यांची नेमणूक केली आहे. परीक्षा सुरळीतत पार पाडावी, यासाठी आत झोनल अधिकारी तसेच १२० पोलिस कार्यरत असणार आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड