जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुण्यात ५ केंद्र सुरु, नोकरीची संधी, लाभ घ्या! – German Language training in pune
German Language training in pune
आताच आलेल्या बातमी नुसार भारतात उमेदवारांना जर्मनीत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याला महाराष्ट्रातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना राज्य सरकारतर्फे मोफत जर्मन भाषा शिकवली जाणार आहे. मात्र, युवकांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पाच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बाळकृष्ण वाटेकर यांनी ही माहिती दिली.
चार लाख तरुणांना जर्मनीत रोजगार, मनुष्यबळ पुरविण्याबाबत नवीन करार – Germany Jobs for Indian
युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमरता असल्याने राज्यातील कुशल युवकांना युरोपीय देशांमध्ये नोकरी, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी फेब्रुवारीमध्ये करार केला. त्या अंतर्गत बाडेन वुटेनबर्ग राज्याला कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुण्यातील गोएथे इन्स्टिट्यूट मॅक्समुलर भवन आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पथदर्शी तत्त्वावर सुरुवातीला विविध क्षेत्रातील किमान १० हजार कुशल मनुष्यबळ बाडेन वुटेनबर्ग या राज्यास उपलब्ध करून देण्यासाठी एकूण ३० क्षेत्रांची निश्चिती करण्यात आली आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण झालेले विद्यार्थी खालील दिलेल्या लिंक द्वारे नोंदणी करू शकतात. नोंदणी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना राज्य सरकारकडून मोफत जर्मन भाषेचे शिक्षण दिले जाणार आहे. त्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड येथे पाच प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असे वाटेकर यांनी सांगितले. एखाद्यावेळी बाडेन-वुटेनबर्ग राज्याचा अभ्यासक्रम आणि महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात तफावत असल्यास ती दूर करण्यासाठी, गरजेनुसार क्षेत्रनिहाय कौशल्यवृद्धीसाठी युवकांना सरकारकडून मोफत कौशल्यवृद्धीचे अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.