नितीशकुमार सरकार ६ लाख कर्मचाऱ्यांची करणार भरती
Bihar Sarkar BHARTI 2024
बिहारमधील नितीशकुमार सरकार सरकारी विभागात ६ लाख पदे भरण्याची तयारी करत आहे. या अंतर्गत ४५ विभागांमधील जागा भरण्याची घोषणा केली जाऊ शकते. राज्यातील शिक्षण, कृषी, पंचायतराज यांसारख्या खात्यांमध्ये लवकरच नियुक्त्या केल्या जाऊ शकतात.o
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागात २,१७,५९१ पदे, समाजकल्याण विभागात १,८४,००० पदे, आरोग्य विभागात ६५,७३४ पदे, गृह विभागात४१,४१४ पदे रिक्त आहेत. महसूल व भूमिसुधार विभागात १५,२१४ पदे, जलसंपदा विभागात १३,७१२ पदे रिक्त आहेत. याशिवाय अन्य खात्यातही अनेक पदे रिक्त आहेत.
स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटणा येथील गांधी मैदानावर संबोधित करताना बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी १० लाख तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या ३४ लाखांवर जाईल. आतापर्यंत १० लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.