महत्वाचे! – लाडकी बहीण योजनेचे सिडींग कसे करायचे आणि स्टेट्स कसे पहायचे! – Ladki Bahin Aadhaar Seeding
Ladki Bahin Yojana Bank Seeding Status
आपल्याला माहीतच आहे आज १५ ऑगस्ट पासून लाडकी भिन्न योजनेचे ३००० रुपये जमा होणे सुरु झाले आहे. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांनी एक महत्त्वाचे काम करुन घेणे गरजेचे आहे. ये म्हणजे बँक अकाऊंट आणि आधार सिडींग. दरम्यान, राज्यात काही पात्र महिलांना लाभ मिळाला आहे, तर काही महिलांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत. काही महिलांचे अर्ज मात्र फेटाळण्यात आले आहेत. अर्ज फेटाळण्याची अनेक कारणे असू शकतात. या मधील एक महत्वाचे कारण म्हणजे आधार सिडींग नसणे! या बाबतीत पुढील अपडेट्स साठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
लाडक्या बहिण योजनेची निवड यादी प्रसिद्ध, येथे चेक करा! – Ladki Bahin Nivad Yadi Download
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून अर्ज दाखल केलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 64 लाख 40 हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील जवळपास 1 कोटी 36 लाख पात्र महिला आहेत. अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पात्र महिलेच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे.या योजनेअंतर्गत अधिकाधिक माता-भगिनींपर्यंत सन्माननिधी वितरित करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे,” असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
तर ‘या’ एका कारणामुळे लाभ मिळणार नाही
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केला आहे. यातील 1 कोटी 36 लाख महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र अर्ज दाखल करताना संबंधित महिला अर्जदाराचे बँक खाते आधारशी संलग्न नसेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे. तसे नसल्यास महिलांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर महिलांनी आपले ‘बँक सिडिंग’ स्टेटस चेक करावे. आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसतील तर ते लवकरात लवकर करून घ्यावे. त्यानंतरच तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील. बँक सिडिंग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला https://uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. यासोबतच तुमच्या आधारकार्डवरील जो मोबाइल नंबर आहे तो तुमच्या बँक खात्यात नोंदणी असणंही गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या खात्यात नेमके किती पैसे जमा होत आहेत याची नेमकी माहिती मिळेल.
लाडकी बहीणच्या खात्यात तीन हजार जमा होण्यास प्रारंभ – Ladki bahin Three thousand deposit
Table of Contents
Comments are closed.