मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा GR प्रकाशित, पूर्ण माहिती आणि अर्ज करा-लाडका भाऊ योजना- Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 Maharashtra – राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. प्रशिक्षणार्थींना १२ वी पास ६ हजार, आयटीआय/पदविका ८ हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येणार आहे.
लाडका भाऊ योजना म्हणजेच :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
या योजनेंतर्गत खालील तत्क्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना/उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात (DBT) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल.
✅ 12 वि पास बेरोजगार विध्यार्थ्यांना भेटणार 6000 रुपये
✅ डिप्लोमा झालेल्या विध्यार्थ्याला मिळणार 8000 रुपये
✅ पदवीधर विध्यार्थ्याला मिळणार 10000 रुपये
????लाडका भाऊ योजना साठी पात्रता काय
▪️वयोमर्यादा :- 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे.
▪️या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.
▪️या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
▪️शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर इतकी असावी.
▪️या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील.
▪️अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
Comments are closed.