रिक्त मागासवर्गीय पदांसाठी शिक्षक भरती सुरू
पुणे जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या मागासवर्गीय पदांची शिक्षक भरतीची कार्यवाही येत्या आठ दिवसात करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या सूचनेचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील रिक्त असलेल्या मागासवर्गीय पदांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय प्रवर्गाची शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत सांगून, 2019 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय रिक्त पदांमधून केवळ मराठी माध्यमांची पन्नास टक्के प्राथमिक शिक्षकांची पदे भरण्यात आली आहेत. त्यावेळी जिल्हा परिषदेतील बिंदूनामावली (रोस्टर) अद्यावत नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे सीईओंना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच ग्रामविकास मंत्र्यांनी शिक्षकांच्या पदभरतीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची मागासवर्गीय उर्वरीत पन्नास टक्के पदे भरण्याची कार्यवाही आठ दिवसांमध्ये करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेची बिंदुनामावली अद्यावत असल्याचे शासनास तात्काळ कळवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
तसेच सद्यस्थितीत बिंदुनामावलीनुसार प्रवर्गनिहाय मागासवर्गीयांची प्रत्यक्षात किती पदे आहेत त्याचा प्रवर्ग निहाय तपशील शासनास तात्काळ सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे म्हणाले, जिल्ह्यात 32 मागासवर्गीय शिक्षकांची पदे रिक्त असून, त्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांनुसार भरती करण्यात येईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आगनवाडी फार्म कधी सुटणार
Yez
महाराष्ट्रात प्राध्यापक भरती कधी पासून सुरु होणार आहे