राम मंदिरात निघाली पुजाऱ्यांची मोठी भरती; पगार किती, अर्ज कसा करणार? जाणून घ्या – Ayodhya Ram Mandir Pujari Bharti

Ram Mandir Jobs 2023 Ayodhya

उत्तर प्रदेशच्या अयोध्येमध्ये भव्य असे राम मंदिर उभारले जात आहे. त्यात आता राम मंदिरामध्ये पुजाऱ्यांनी भरती निघाली आहे. यासंदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने इच्छूक उमेदवारांकडून प्रस्ताव मागितले आहेत. ३१ ऑक्टोंबरपर्यंत या पदासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज तपासल्यानंतर उमेदवारांना प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच अर्जदाराने सहा महिने श्री रामानंदीय दीक्षा घेऊन गुरुकुल शिक्षण पद्धतीत शिक्षण घ्यावे लागेल.  अर्जदाराचे वय २० वर्षापेक्षा कमी आणि ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या काळात उमेदवारांना २ हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत. त्यानंतर या उमेदवारांची पुजारी म्हणून मंदिरात नियुक्ती केली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण होईल.

राम मंदिर बनून पूर्ण होण्याच्या आधीच उमेदवारांची निवड करण्याची योजना ट्रस्टची आहे. जेणेकरुन पुढील कार्यक्रमांमध्ये काही अडथळा येणार नाही. तसेच उमेदवारांचा वापर करता येईल. मकर संक्रातीनंतर मंदिराचे उद्घाटन होणार आहे. २१ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराचे उद्घाटन करतील.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड