जिल्हा परिषद उर्दु माध्यमाच्या शिक्षकांची ‘पवित्र’द्वारे भरती, ३१३ शिक्षकांची पदे रिक्त । Amravati Shikshak Bharti 2024

Amravati Shikshak Bharti 2024

Amravati Shikshak Bharti 2024

Amravati Shikshak Bharti 2024 : Out of these 58 vacancies of Urdu medium are going to be filled through the holy portal. The education department has recently submitted the information for this to the government. Sources said that the process will start soon. Interestingly, although the posts in the pesa sector will not be filled at present, these posts will also be filled during the upcoming recruitments in the pesa sector.

 

 जिल्हा परिषद शाळांवरीलशिक्षकांची बिंदू नामावली निश्चित झाल्यानंतर बदली, समायोजन प्रक्रिया जवळपास आटोपली आहे. यानंतर जिल्ह्यातील मेळघाट या (पेसा) क्षेत्रात ३१३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.तर गैरआदिवासी भागात उर्दु माध्यमाची ५८ शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. या जागा भरण्यासाठी शासनस्तरावरून आता हालचाली सुरू झाल्या आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून यापैकी उर्दु माध्यमाच्या ५८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीचे माहिती शिक्षण विभागाने नुकतीच शासनाकडे सादर केली आहे. लवकरच प्रक्रिया सुरू होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे सध्या पेसा क्षेत्रातील पदे सध्या भरली जाणार नसली तरी ही पदेही आगामी काळात होणाऱ्या पेसा क्षेत्रात होणाऱ्या पदभरती दरम्यान भरली जाणार आहेत.

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बिंदू नामावलीचं भिजत घोंगडं मागील अनेक वर्षांपासून कायम होते. त्यामुळे गरज असतानाही शिक्षकांच्या बदल्या करता येत नव्हत्या. याशिवाय आंतरजिल्हा बदलीनेही शिक्षकांना रिक्त जागेवर सामावून घेतांना अडचणी होत्या. नव्याने भरतीही करता येत नव्हती. त्यामुळे शिक्षण विभागाने हा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला होता.

सीईओ अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी बुध्दभुषण सोनवने व त्याच्या चमूने बिंदू नामावलीचे काम पूर्ण करून घेतले.बिंदूनामावली निश्चित झाल्यानंतर रिक्त जागांची स्थिती समोर आली. यात जिल्हा परिषदेतील उर्दु माध्यमाच्या ५८ जागा रिक्त असलेल्या या जागा आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. याअनुषंगाने शिक्षण विभागाने शासनाकडे माहिती सादर केली आहे.

‘उर्दू’ माध्यमाला मिळणार शिक्षक
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उर्दू शाळाही चालविल्या जातात. या शाळांवरील शिक्षकांच्या ५८ जागा रिक्त आहेत. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या जागाही आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

बिंदू नामावली निश्चित केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षकांच्या पेक्षा क्षेत्रातील मराठी माध्यमाची ३१३ पदे रिक्त आहेत.ही पदे ज्यावेळी पेसा क्षेत्रातील स्वतंत्र पद भरती होईल त्यावेळी भरली जातील. आता मात्र उर्दु माध्यमाची जवळपास ५८ जागा रिक्त आहेत.या जागेवर आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.रिक्त जागाबाबतची माहिती शासनाला सादर केलेली आहेत. लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल.
– अविश्यांत पंडा मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. अमरावती


Amravati Shikshak Bharti 2023

Amravati Shikshak Bharti 2023: Document verification workshop of the candidates in the teacher recruitment process in the profession sector under Education Department Primary, Zilla Parishad Amravati is organized as per the following plan. As per that schedule the shortlisted candidates should attend with all the original documents and a set of self attested photocopies as per the checklist provided, along with self declaration form (A4 size on plain paper), small family affidavit as provided along with one color passport size photograph. Check Amravati Shikshak Bharti 2023 Document Verification date at below

शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रियेतील उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी कार्यशाळा खालील नियोजनाप्रमाणे आयोजित केलेली आहे. त्या नियोजनाप्रमाणे सोबतच्या यादीतील उमेदवारांनी सोबत दिलेल्या चेकलिस्ट प्रमाणे सर्व मुळ कागदपत्रे व स्व साक्षांकित छायांकित प्रतीचा संच, सोबतच्या नमुन्यातील स्वघोषणापत्र ( साध्या कागदावरील A४ साईज ), सोबत दिल्याप्रमाणे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, तसेच एक कलर पासपोर्ट साईज फोटोसह उपस्थित रहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Amravati Shikshak Bharti 2023 Document Verification Date

Amravati Shikshak Bharti 2023 Document Verification Date

Download the Amravati PESA Shikshak Bharti Selection List


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. शाहीन शेख says

    ऊर्दू माध्यम शिक्षका भरती ला कशा करायचं

  2. Tushar Nandkishor pande says

    Sarjob ki jarurat hai please ????

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड