पोलिस पाटील भरती २०२०
Police Patil Bharti 2020
पोलिस पाटील हवे आहेत…
म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा तालुक्यात ८१ महसुली गावे आहेत. गाव तेथे पोलिस पाटील असे सरकारचे धोरण असून, तालुक्यात केवळ २८ पोलिस पाटील कार्यरत आहेत. कार्यरत पोलिस पाटील हे मयत किंवा निवृत्त झाल्याने १२ गावे पोलिस पाटलांच्या नेमणुका अगर कार्यभार दिला नसल्याने वाऱ्यावर असल्याची माहिती पुढे येत आहे. म्हसळा पोलिस ठाण्याला तालुक्यातील ६६ गावे, दिघी सागरी पोलिस ठाण्याला सात गावे आणि गोरेगाव पोलिस ठाणे अंतर्गत आठ गावे येत आहेत.
गावांमध्ये सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच चोरी, चोरीचा माल, कैदी, संशयित मृत्यू, विविध प्रकारच्या गुन्ह्यांसंदर्भात पोलिसांना वेळोवळी माहिती देणे आणि प्रामुख्याने तलाठी, ग्रामसेवक आणि पोलिस अधिकाऱ्यांना विविध तपासात नियमित सहकार्य करण्याचे काम; तसेच साथीचे आजार, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या महत्त्वाच्या कामात पोलिस पाटील चांगली भूमिका करत असतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पोलिस पाटलांचा कार्यभार
ग्रामीण भागात मुंबई नागरी कायदा १८५७ नुसार हे पद निर्माण करण्यात आले. गावांमध्ये पोलिस पाटलांकडे कायद्याचा प्रथम पालक म्हणून पाहिले जाते. कायदा व सरकारचे काम करताना पोलिस पाटलांना अनेक अडचणी येतात. घडलेल्या गुन्ह्याचा तपास लावताना पोलिसांना योग्य ती माहिती व गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांच्या अटकेपर्यंतची मदत पोलिस पाटील करत असतो.
नव्या सरकारने पोलिस पाटलांच्या नेमणुका आरक्षणानुसार आणि लेखी चाचणी परीक्षा घेऊन पदे भरण्याचे नियम केले. काही गावांतून आरक्षणाप्रमाणे लोकवस्ती नसते. म्हसळा तालुक्यांतील अनेक गावांत शाश्वत विकास होत असल्याने अतिरिक्त कार्यभार झेपणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. सरकारने रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
पोलिस पाटलांची उपविभागनिहाय बिंदू नामावली अद्ययावत करून त्यांची भरती प्रक्रिया संबंधित उपविभागीय कार्यालयामार्फत केली जाते. म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील रिक्त पदांची माहिती रायगड जिल्हाधिकार्!यांना सादर करण्यात येईल. त्यांनी आदेश दिल्यावर कार्यवाही पूर्ण होईल.
रिक्त असलेली तालुक्यातील गावे
कुडतोडी, ढोरजे, मोरवणे, देहेन, वांगणी, भापट, ताम्हने करंबे, कोलवट, चिरगाव, भेकऱ्याचा कोंड, रातीवणे, रोहिणी.
पोलिस पाटील भरती परीक्षा केव्हाही देता येते काय
गावातील पोलीस पाटील मयत झाली असता त्याच्या जागेवर दूसरा पोलीस पाटील किती दिवसांनी नेमनुक करता येतो,व त्यासाठी काय नियम आहेत.
गावातील पोलीस पाटील मयत झाली असता त्याच्या जागेवर दूसरा पोलीस पाटील किती दिवसांनी नेमनुक करता येतो,व त्यासाठी काय नियम आहेत.
Police patil sati bharti rohini gav sati