अर्ज सुरु – महाराष्ट्र लेखा व कोषागार विभागात शासकीय लिपिकांसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा – Mahakosh Bharti 2024
Mahakosh Bharti 2024
Mahakosh Recruitment 2024
Mahakosh Maharashtra Bharti 2024 – महाराष्ट्र शासन, वित्त विभागांतर्गत लेखा व कोशागारे संचालक यांच्यामार्फत लेखाविषयक काम करणारे लिपिकवर्गीय (तृतीय श्रेणी) कर्मचाऱ्यांसाठी १० वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट- क सेवा विभागीय परीक्षा (भाग एक आणि दोन) ही डिसेंबर मध्ये प्रस्तावित आहे. तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांनी आठ नोव्हेंबरपर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालय प्रमुखांकडे जमा करावेत, असे आवाहन सहसंचालक महेश बच्छाव यांनी केले आहे.. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परीक्षेसाठी पात्रता
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
(१) महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षा नियम २०१२, अधिसूचना दि.०३.०३.२०१२ नियम ३ (ख) नुसार भाग १ करीता व (ग) (घ) भाग-१ व भाग-२ करीता तसेच ३ (ड) व (च) नुसार भाग-२ च्या परीक्षेस बसण्यास कर्मचारी पात्र असतील. तथापि, नियम ३(व) नुसार सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे, इतर विभागातील शासकीय कर्मचारी हे लेखा व कोषागारे गट-क सेवा किंवा स्थानिक निधी लेखा गट-क सेवा यांच्या संदर्भात रोपाप्रवेश किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे लाभ मिळण्यास पात्र असणार नाहीत.
इतर सूचना :-
৭) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक इएक्सएम-१०८०/१७, दिनांक १७ एप्रिल, १९८० नुसार महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट क सेवा विभागीय परीक्षा (भाग-१ व भाग-२) मराठी माध्यमातूनच घेण्यात येणार आहे. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुखांनी ही बाब, परीक्षार्थीच्या निदर्शनास आणावी.
२) मराठीतून नियम पुस्तके तयार नसल्यास परिक्षार्थीनी उत्तरे लिहितांना, जिथे कोणताही नियम उद्धृत करणे आवश्यक आहे तिथे तो नियम इंग्रजीतून लिहिण्यास हरकत नाही. मराठी प्रतिशब्द आठवत नसतील तेथे इंग्रजी शब्द वापरण्याची मुभा उमेदवारांना देण्यात येत आहे. मात्र उत्तराचा बाकीचा मजकूर मराठीतूनच लिहिणे अनिवार्य आहे.
३) उपरोक्त अधिसूचनेनुसार महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षेतील भाग-२ मधील पेपर क्रमांक ४ इंग्रजी ऐवजी मराठी भाषेमध्ये घेण्यात येणार असून सदर प्रश्न पत्रिकेचे स्वरुप खालीलप्रमाणे राहील:- १. दिलेल्या प्रकरणांचा सारांश लिहिणे गुण ४० २. पत्राचा मसुदा तयार करणे गुण ४० ३. शब्दांचा उपयोग करणे आणि वाक्यांची दूरुस्ती करणे गुण २०
परीक्षेस बसण्यासाठी अर्ज करण्याची पध्दती :-
१) सदर परीक्षेस बसण्यासाठी परवानगी मागण्यांबाबतच्या अर्जाचा नमुना या परिपत्रकासोबत जोडण्यात आला आहे. शासनाच्या आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील उमेदवारांना खाली नमूद केलेल्या जिल्हयांकरीता त्यांच्यासमोर दर्शविलेल्या केंद्रामध्ये सदर परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना नेमून दिलेली परीक्षा केंद्रे बदलता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
२) महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षा (भाग-१ व भाग-२) सन २०२४ चे वेळापत्रक यथावकाश स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.
३) १० वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षा (भाग-१ व भाग-२) सन २०२४ साठी बसू इच्छिणा-या उमेदवारांना अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये दिनांक दि.०८/११/२०२४ (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत) किंवा त्यापूर्वी त्यांच्या कार्यालय / विभागप्रमुखांना सादर करावेत. जिल्हा परिषद कर्मचा-यांचे अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावेत. ड) कार्यालय / विभाग प्रमुखांना सूचना १) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुखांना विनती करण्यात येते की, १० वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षा (भाग-१ व भाग-२) सन २०२४ या परीक्षेस बसू इच्छिणा-या उमेदवारांचे अर्ज २ प्रतीत स्विकारण्यात यावे. सदर अर्जाची नियमानुसार छाननी करुन मुळ प्रत आपल्या प्रादेशिक विभागातील संबंधीत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे यांचेकडे (खालीलप्रमाणे नमूद केलेल्या कार्यालयात) दि.१४/११/२०२४ (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत) पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा पध्दतीने पाठविण्यात यावेत. उमेदवारांचे अर्ज कार्यालय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी/विभाग प्रमुख यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने प्रमाणित करावेत. त्यांच्या कार्यालयातील अन्य अधिकाऱ्यांनी हे अर्ज प्रमाणित केल्यास ते स्विकारण्यात येणार नाही.
दि.१४/११/२०२४ (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत) नंतर विभागीय सहसंचालकाकडे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार कोणत्याही कारणास्तव करण्यात येणार नाही, याची सबंधीत कार्यालय प्रमुखांनी नोंद घ्यावी.
महत्वाचे मुद्दे :- १. परीक्षेस बसणाऱ्या उमेदवाराने त्यांच्या कार्यालय प्रमुखाकडे दि. ०८/११/२०२४ (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत) अर्ज सादर करावा व त्यांच्या कार्यालय प्रमुखानी संबंधित विभागीय सहसंचालक यांचेकडे दि. १४/११/२०२४ (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत) अर्ज सादर करावे.
Download Mahakosh Bharti PDF 2024
Mahakosh Maharashtra Bharti 2024 – प्राप्त माहिती नुसार, महाराष्ट्रातील महोत्सवाअंतर्गत राज्यातील विविध विभागांत ७५ हजार जागांसाठी भरती करण्यात येणार असून, लेखा व कोषागार विभागातील गट क पदांचाही यात समावेश आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया लकरच अपेक्षित आहे. यासाठी ऑक्टोबर २०२३ ला जाहिरात काढायची होती; पण दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप भरतीप्रक्रियेला प्रारंभ झाला नसल्याने लेखा व कोषागार विभागातील ६१७ पदांसाठीची भरती रखडली आहे. कनिष्ठ लेखापाल पदाच्या रिक्त जागांसाठी तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना दिलासा देण्याची मागणी सुशिक्षित बेरोजगार करीत आहेत. विभागनिहाय कनिष्ठ लेखापाल पदाच्या ६१७ जागा भरण्यासंबंधीची कार्यवाही अजूनही प्रलंबित आहे. वित्त विभागाने दहा महिन्यांपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे सहसंचालकांना सूचित केले होते; परंतु आजपर्यंत त्यासाठी मुहूर्त सापडला नाही. राज्यातील सहा प्रशासकीय विभागांपैकी कोकण, पुणे, अमरावती विभागात भरतीसंबंधाने हालचाली सुरू असल्या तरी नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागात कुठलीच प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजागारांना अजूनही वाट पाहावी लागत आहे.
विभागनिहाय कनिष्ठ लेखापालाच्या जागा लेखा व कोषागार विभागात विभागनिहाय भरती करण्यात येत असलेल्या रिक्त जागा अशा- कोकण विभाग १७८, पुणे विभाग ६६, नाशिक ३९. छत्रपती संभाजीनगर ३६, अमरावती ४७, तर नागपूर विभागात ५८ जागा आहेत.
Accounting Treasuries advertising is expected soon. Seats under this advertisement are expected to be – 800+. Tcs will also conduct the exam for this recruitment. More details are given below.
लेखा कोषागारे जाहिरात लवकरच येणे अपेक्षित आहे. या जाहिराती अंतर्गत जागा – 424 किंवा 800 + असतील असे अपेक्षित आहे. तसेच या भरतीची परीक्षा TCS घेणार आहे. अर्ज कालावधी – १० ते १५ दिवसांचा असेल. परीक्षा – अर्ज मुदत संपल्यानंतर एक महिन्यानंतर निकाल लागणे अपेक्षित आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जुना कृती आराखडा खालील दिलेलं आहे, यानुसार नवीन वेळापत्रक आणि अपडेट्स लवकरच येतील.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे अनुषंगाने शासकीय कार्यालयातील ७५००० हजार पदे भरावयाची आहेत. त्यानुषंगाने सरळसेवेने रिक्त असलेल्या पदांची पदभरती सेवाभरतीची करावयाची आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि. ०४.०५.२०२२ मधील अ. क्र. २ इ) नुसार जाहिरात ज्या महिन्यात दिली जाईल त्या महिन्यापासून पुढील एका वर्षात नामनिर्देशनाने भरतीसाठी उपलब्ध होणान्या संभाव्य रिक्त पदांची संख्या विचारात घेऊन निवड प्रकिया करावी असे नमुद केले आहे. तरी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात माहिती सादर करावी. सदरची माहिती दि.०९.०६.२०२३ पर्यंत सादर करण्यात यावी, या आशयाचे परिपत्रक विभागाद्वारे जाहीर झाले आहे. या नुसार या भरतीच्या हालचाली सुरु झाल्या असून लवकरच जाहिरात येणे अपेक्षित आहे.
finance department chi jaga kadhi yenar